चौकीदारच चोरांना शिक्षा करणार : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2019
Total Views |
 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी ओडीशा दौऱ्यावर असताना विविध विकासकामांचे भुमिपूजन आणि उद्घाटन केले. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ज्यांनी ज्यांनी या देशात गरीबांना लुबाडण्याचे काम केले त्यांना हा चौकीदार शिक्षा केल्याशिवाय शांत बसणार नाही. मोदी सरकार विकासाच्या पंचसुत्रीवर काम करत आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण, तरुणांना रोजगार, ज्येष्ठांना औषधोपचार, शेतकऱ्यांसाठी सिंचन सामग्री आणि सर्वसामान्यांचे प्रश्न समोर ठेवून निर्णय़ घेण्यात येत आहेत.

 

ओडिशामध्ये केवळ रेल्वे प्रकल्पांसाठी २० हजार कोटींची विकासकामे झाली आहेत. कॉंग्रेसने केलेल्या कामांपेक्षा हे प्रमाण पाच पट अधिक आहे. त्यांना इतकी कामे करण्यासाठी २५ ते ३० वर्षे निवडून द्यावे लागले असते. बलांगीर ते बिछुपलीपर्यंत रेल्वे कांमांची सुरुवात झाली आहे. आज तिथून रेल्वे धावण्यासही सुरुवात झाली आहे.

 

मोदींकडून १५४५ कोटींच्या विकासकामांची भेट

 

मकर संक्रांतीचा उत्साह देशभर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी पुन्हा एकदा १५४५ कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन आणि भूमीपूजन करत ओडिशावासीयांसाठी मोठी भेट दिली आहे. बलांगीर रेल्वे स्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले, केंद्र सरकारकडून ओडिशाच्या विकासासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. ओडिशामध्ये केलेली विकासकामे शिक्षण, पर्यटन, संस्कृतीशी जोडलेली आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@