तीळगूळ खा आणि आरोग्य राखा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2019
Total Views |


'तीळगुळ घ्या आणि गोड बोला' हे वाक्य संक्रांतीला प्रत्येकाच्या तोंडी असतं. पण असं का बरं म्हणत असतील? गोडव्यासोबतच गुळात आणखी कोणकोणते गुण असतात? चला, जाणून घेऊया.

 

तिळामुळे थंडीत शरीराला आवश्यक असलेली उष्णता मिळते, सांध्यांमध्ये हवी असलेली स्निग्धता टिकून राहते आणि तीळ शरीराला बलही देतो. गुळामुळे पदार्थाला गोडवा आणि खमंगपणा तर येतोच पण त्यामुळे अनेक आरोग्यदायी लाभही मिळतात. आयुर्वेदसंबंधी अनेक ग्रंथातही गुळाच्या आरोग्यदायी गुणांचं वर्णन केलेलं आढळतं.

 

गुळाच्या नियमित आणि योग्य सेवनानं रक्तशुद्धी होण्यास मदत होते. रक्तातलं हिमोग्लोबिन वाढतं आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते. रक्तातून होणा-या विषाणू संक्रमणावरही गुळाच्या सेवनाने मात करता येते.

 

गुळात लोह विपुल प्रमाणात उपलब्ध असतं. भारतातल्या स्त्रियांमध्ये रक्तात लोहाची कमतरता मोठ्या प्रमाणावर आढळून येते आणि हेच अनेक प्रकारच्या आजारांचं कारण असतं. गुळाच्या माध्यमातून ही कमतरता पूर्ण होते.

 

अतिश्रमाने किंवा उन्हात अधिक काळ राहिल्याने शरीरातील ऊर्जा कमी होते. ही ऊर्जा परत मिळवण्याचं उत्तम साधन म्हणजे गूळ. म्हणून उन्हातून आलेल्या पाहुण्याला गूळपाणी द्यायची प्रथा आपल्याकडे आहे.

 

गुळात सुक्रोजसोबतच खनिजं, क्षार, लोह आणि तंतुमय पदार्थ असतात. त्याचं पचन संथ गतीनं होतं आणि त्यातून मिळणारी ऊर्जाही संथ गतीनं प्रसारित होते आणि दीर्घकाळ टिकते. त्यामुळे शरीरासाठी लाभदायक आहे. त्यामुळेच मधुमेह टाळण्यासाठी आणि असणाऱ्यांना देखील गुळापासून लाभ मिळतो.

 

याशिवाय गूळ हा उत्तम पाचक आहे. हिवाळ्यात पचनशक्ती मंदावते त्या काळात गुळाचं सेवन अधिक प्रमाणात केल्या पचनाचे त्रास दूर होण्यास मदत होते.

 

 
 

गुळाचा आणखी एक गुण म्हणजे गुळात खनिजे भरपूर प्रमाणात असतात. यातल्या पोटॅशियममुळे शरीरातील चयापचयक्रिया सुधारते व त्यामुळे वजन नियंत्रणात येण्यास मदत होते. या आणि अशा अनेक कारणांमुळेच संक्रांतीला तिळगूळ किंवा गुळाची पोळी खाण्याची प्रथा आहे.

 

असा हा गुणकारी गूळ पितांबरीनं रुचियाना या नावाने उपलब्ध केला आहे. रुचियाना गुळाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गूळ पूर्णपणे सेंद्रीय आहे. म्हणजेच बाजारात मिळणा-या पिवळ्या किंवा सोनेरी गुळात असतात तसे कोणतेही रासायनिक घटक यात मिसळले जात नाहीत. हा गूळ तयार करताना स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जाते. लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टीलच्या काहिलीत तो तयार केला जातो. अनेक तपासण्या केल्या जातात. शिवाय रुचियाना गूळ हा पावडर स्वरूपात उपलब्ध असल्याने सहज विरघळतो. त्यामुळे तीळगुळ तसेच इतर पदार्थ बनवणं आता आणखी सोपं झालं आहे.

 

संक्रांत किंवा संक्रमण म्हणजे चांगल्या दिशेने जाणे. चला तर, आपण रुचियाना गूळ वापरून निरोगी आयुष्याकडे संक्रमण करू या.

 

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@