सर्वसामान्यांना वेठीस धरू नका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2019
Total Views |



बेस्ट कर्मचा-यांना मुंबई उच्च न्यायालयाचे खडेबोल

 

मुंबई : सलग सातव्या दिवशीही बेस्ट कर्मचा-यांचा संप सुरू असल्याने मुंबईकरांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, बेस्टच्या संपाबद्दल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी बेस्ट कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपाबद्दल नाराजी व्यक्त करत सर्वसामान्यांना वेठिस धरू नये असे खडेबोल न्यायालयाकडून सुनावण्यात आले.

 

सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने बेस्ट कर्मचा-यांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत सर्वसामान्यांना वेठिस न धरण्याच्या सुचना केल्या. परंतु सुनावणीदरम्यान सरकारचे महाधिवक्ता अनुपस्थित असल्याने न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी तहकूब केली. दरम्यान, बेस्ट कामगार संघनेची सरकारच्या उच्चस्तरीय समितीबरोबर सकारात्मक बैठक पार पडली. परंतु कर्मचारी लेखी आश्वासनावर ठाम असल्याने संप कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बेस्ट कामगार कृती समिती आणि बेस्ट प्रशासनाने शनिवारी राज्य सरकारसमोर आपले म्हणणे मांडले होते. त्यानंतरही यावर तोडगा निघाला नव्हता. कामगारांचा वेतन करार, कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणे आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता.

 

तब्बल २१ कोटींचे नुकसान

 

बेस्ट प्रशासनाला दिवसाला तीन कोटी रूपयांचा महसून मिळतो. परंतु आज संपाचा सलग सातवा दिवस असल्याचे बेस्ट प्रशासनाचे तब्बल २१ कोटींचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. कामगारांनी ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संप पुकारला होता. दरम्यान, न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर राज्य सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती.

 

मनसेही मैदानात

 

संपावर तोडगा न काढल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला होता. त्यानंतर सोमवरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडचे काम बंद पाडले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी वरळीमध्ये सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन सर्व साधन सामग्री हलवण्यास भाग पाडले. तसेच या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कार्यालयांना टाळे ठोकून आपला विरोध दर्शवला. तसेच संप मिटल्याशिवाय कोस्टल रोडचे काम सुरू करू देणार नसल्याचाही इशारा यावेळी देण्यात आला.

 

दिवसाला तीन कोटींचा तोटा

 

बेस्टचे एका दिवसाचे उत्पन्न तीन कोटी रूपये आहे. तर त्यांचा दिवसाचा खर्च तब्बल ६ कोटी आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाला दिवसाला ३ कोटी रूपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. तसेच बेस्टच्या डोक्यावर सध्या अडीच हजार कोटींचे कर्ज असून महिन्याला त्यांना २०० कोटी रूपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. २०१८-१९ साठी बेस्टने ७६९ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मांडला आहे. तसेच बेस्टला उपलब्ध झालेल्या अनेक पर्यायांमुळे बेस्टच्या तोट्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@