शिवाजीराव देशमुख यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2019
Total Views |
 
 

मुंबई : काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि विधान परिषद माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी बॉम्बे रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ राजकीय क्षेत्राला त्यांनी योगदान दिले.

 

शिवाजीराव देशमुख हे मुत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. महिन्याभरापासून बॉम्बे रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. विधान परिषदेचे सभापती असताना सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांचा संघर्ष शमवण्याचे कसब त्यांच्यात होते. त्यांच्यावर मंगळवारी सांगली जिल्ह्यातील कोकरुड या मुळगावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

 

शिवाजीराव देशमुख यांचा जन्म १ सप्टेंबर, १९३५ रोजी सांगली जिल्ह्यात झाला. देशमुख हे १९९६ ते २००२ या कार्यकाळात त्यांनी विधानपरिषदेचे सभापतीपद भूषवले होते. त्याआधी १९७८, १९८०, १९८५ आणि १९९० असे चार वेळा ते शिराळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@