पालिका शाळेत स्वतंत्र आसने हवीत : आशा मराठे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2019
Total Views |


मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळा, अनुदानीत, विनाअनुदानीत शाळांमध्ये प्रत्येक विदयार्थ्यांसाठी स्वतंत्ररित्या सुसज्ज आसन व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका आशा मराठे यांनी ठरावाच्या सुचनेव्दारे केली आहे.

 

मराठे यांनी म्हटले आहे की, ”मुंबई महानगरपालिकेचा २ हजार ५५३ कोटी रूपयांचा शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प असुनहीं महानगरपालिकेच्या शाळांच्या बाबतीत उदासिन असल्याचे दिसून येत आहे. वयोमानानुसार किंवा इयत्तेनुसार आसनव्यवस्था असणे आवश्यक आहे.

 

परंतु, पहिली आणि दहावीच्या विद्यार्थांसाठीची आसन व्यवस्था एकसमान आहे. शालांत परिक्षेच्या काळात लहान आकाराच्या आसनव्यवस्थेमुळे विदयार्थ्यांना गैरसोयीचे व त्रासाचे होत आहे. त्यामुळे शाळांमध्ये प्रत्येक विदयार्थ्यांकरिता स्वतंत्ररित्या सुसज्ज आसन व्यवस्था करण्यात यावी ” अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@