भाजप शिक्षक सेल संयोजकपदी प्रा. अनिल बोरनारे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2019
Total Views |
 
 

मुंबई : शिक्षक नेते प्रा. अनिल बोरनारे यांची भारतीय जनता पक्षाच्या मुंबई आणि कोकण विभाग भाजप शिक्षक सेलच्या संयोजकपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे मुंबई कोकण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या २० वर्षांपासून अनिल बोरनारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर लढा देत असून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवाशर्तीचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देत आहेत.

 

कायम विना अनुदानित शाळांचा कायम शब्द काढणे,जुनी पेंशन योजना, प्लॅन नॉन प्लॅन मधील भेदभाव दूर करणे, कॅशलेस मेडिक्लेम योजना, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन,शिक्षकेतरांचा आकृतिबंध, विना अट वरिष्ठ निवडश्रेणी लागू करणे, सातवा वेतन आयोग यासह अनेक प्रश्नांना वाचा फोडून लढा दिला आहे.

 

मुंबई आणि कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात भाजप शिक्षक सेलचा विस्तार करण्यात येणार असून शाळा तिथे शिक्षक सेल ही योजना राबविणार असल्याचे प्रा.अनिल बोरनारे यांनी सांगितलेमुंबई कोकण विभागातील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जिल्हा शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, विभागीय उपसंचालक, संचालक, शिक्षण आयुक्त मंत्रालायस्तरावरील प्रलंबित प्रश्न संबंधित अधिकार्यांसमवेत बैठका आयोजित करण्यात येऊन निकाली काढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@