निळा दिवा टाळणार ट्रेनमधील अपघात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2019
Total Views |



मुंबई : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकल. या लोकलमध्ये प्रवास करताना अनेक अपघात घडतात. या अपघाताला आला घालण्यासाठी मध्य रेल्वेने अनोखी शक्कल लढवली आहे. लोकलमध्ये चढताना अपघात होऊ नये यासाठी प्रवेशद्वारावर एक निळ्या रंगाचा दिवा बसवण्यात आला आहे. ट्रेन सुरु होताना दिवा पेटेल आणि ट्रेन चालू होत असल्याचे आपल्याला कळू शकेल. यामुळे थोड्याफार प्रमाणात तरी अपघात रोखाने शक्य होईल.

 
 
 

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. या व्हिडिओत ट्रेन सुरु होत असताना निळा दिवा पेटतो. दिवा तीन-चार वेळा चालू-बंद झाल्यावर ट्रेन प्लॅटफॉर्मवरुन रवाना होताना दिसते. गोयल आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, "सेफ्टी फर्स्ट. लोकलमध्ये चढणाऱ्या प्रवाशांसाठी प्रत्येक कोचच्या प्रवेशद्वारावर निळ्या रंगाचा दिवा लावण्यात आला असून, हा दिवा प्रवाशांना लोकल सुरू झाल्याचे सूचित करेल. यामुळे शेवटच्या क्षणी लोकलमध्ये चढताना होणाऱ्या दुर्घटना टाळता येतील."

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@