मुख्यमंत्री साधणार शेतकऱ्यांशी ‘लोकसंवाद’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2019
Total Views |


 


मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १४ जानेवारीला सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांशी लोकसंवादसाधणार आहेत. मुख्यमंत्री आणि लाभार्थी यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हा लोकसंवादहोणार आहे. हा लाईव्ह संवाद मोबाईल, संगणक, टॅब आणि लॅपटॉपवरही पाहता येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ जानेवारीला लोकसंवादसाधून जाणून घेतली. या लोकसंवादाला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर मुख्यमंत्री आता शेतकऱ्यांशी लोकसंवाद साधार आहेत.

 

राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी आखलेल्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरु असून मुख्यमंत्री राबवलेल्या योजनांचा सातत्याने आढावा घेत असतात. लोकसंवादहा याचाच भाग असून हा थेट लाईव्ह संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या www.twitter.com/Dev_Fadnavis या ट्विटर हॅण्डलवर तसेच www.facebook.com/devendra.fadnavis या फेसबुक पेजवर आणि www.youtube.com/DevendraFadnavis या यूट्यूब चॅनलसह माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे ट्विटर www.twitter.com/MahaDGIPR www.facebook.com/MahaDGIPR या फेसबुक पेजसह www.youtube.com/maharashtradgipr या यूट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे. त्याशिवाय http://elearning.parthinfotech.in/ या लिंकवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@