कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यावर भर देण्याची गरज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2019
Total Views |



उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे सीआयआय पार्टनरशिप समिटमध्ये आवाहन

 

मुंबई : सी.आय.आय. या औद्योगिक संस्थाच्या शिखर संस्थेची २५ वी वार्षिक भागिदारी परिषद (सीआयआय पार्टनरशिप समिट-२०१९) न्यु इंडिया रायजिंग ग्लोबल ओकेशन्सचे आज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते मुंबई येथे उद्‍घाटन झाले. कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यावर भर देण्याचे आवाहन यावेळी नायडू यांनी केले. यावेळी ते म्हणाले, "देशात येणारी गुंतवणूक आणि उद्योगांचा मुख्य भर हा कृषी क्षेत्रावर असणे आवश्यक आहे. कारण आजही शेती हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा आधार आहे. सुमारे ६० टक्के लोकसंख्येच्या रोजगाराचा प्राथमिक स्त्रोत शेती आहे. शाश्वत शेती आणी सुनिश्चित रोजगार यासाठी आश्वासक पावले उचलणे आवश्यक आहे."

 

दिनांक १२ आणि १३ जानेवारी रोजी मुंबइतील जे डब्ल्यू मेरियेट या हॉटेल मध्ये केंद्र शासन, राज्य शासन आणि कॉन्फीडरेशन ऑफ इंन्डस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने २५ वी जागतिक भागिदारी परिषद आयोजित करण्यात आली आहे. २५ वर्षात मुंबईला प्रथमच आयोजक होण्याचा मान मिळाला आहे. या परिषदेला जगातील सुमारे ४० देशातील उद्योजक एकत्र आले आहेत. यावेळी नायडू यांनी सरकारच्या कामकाजाचे कौतुक करत देश औद्योगिक विकासात खासगी क्षेत्रात तरुणांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास सक्षम करण्यासाठी त्यांच्या स्किलींग प्रोग्रामची आवश्यकता आहे तसेच महिलांना देखील खासगी क्षेत्रात समान संधी मिळावी अशी अशा नायडू यांनी व्यक्त केली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@