भुवीचे बळींचे शतक तर धोनीच्या दहा हजार धावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2019
Total Views |


 


सिडनी : सिडनी येथे सुरु असलेल्या भारत वि. ऑस्ट्रेलिया संघातील पहिला एकदिवसीय सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने ५ गड्यांच्या मोबदल्यात २८८ धावांपर्यंत मजल मारत भारताला विजयासाठी २८९ धावांचे आव्हान दिले आहे. दरम्यान, धावांचा पाठलाग करायला मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला डावाच्या सुरुवातीसच ३ महत्वाचे झटके बसले. शिखर धवन, विराट कोहली आणि अंबाती रायडू स्वस्तात बाद झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्माने भारतीय डावाला संभाळले असले तरी, या सामान्यत भुवनेश्वर कुमार आणि महेंद्रसिंह धोनीने विक्रमांना गवसणी घातली आहे. काय आहेत हे विक्रम पाहूया...

 

वन-डे क्रिकेटमध्ये बळींचे शतक

 

भारताचा आघाडीचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात २ बळी घेत, वन-डे क्रिकेटमधले आपले बळींचे शतक पूर्ण केले. आपल्या ९६ व्या वन-डे सामन्यात भुवनेश्वर कुमारने १०० बळींचा हा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो १९ वा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

 

एकदिवसीय सामान्यत धोनीच्या १० हजार धावा

 

सिडनी मैदानात महेंद्र सिंह धोनीने एकदिवसीय सामन्यात १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. हा टप्पा पार करण्यासाठी धोनीला केवळ एका धावेची गरज होती. या सामान्यत ही ऐतिहासिक धाव घेत धोनीने हा महत्वपूर्ण टप्पा पार केला. एकदिवसीय सामन्यात भारताकडून १० हजार धावा करणारा धोनी पाचवा भारतीय ठरला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@