साहित्य संमेलनात पुस्तक विक्री जोरात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2019
Total Views |


साहित्य रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

यवतमाळ (विजय कुलकर्णी) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी सध्या साहित्य रसिकांनी अगदी फुलून गेली आहे. पुस्तक प्रेमींची गर्दी अगदी प्रत्येक स्टॉलवर उफाळून आली आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात स्मार्टफोन आणि संगणकात गुरफटलेली तरुणपिढी ही मोठ्या संख्येने साहित्य संमेलनासाठी उपस्थित असून पुस्तक खरेदीतही आघाडीवर आहे. यंदाच्या साहित्य संमेलनात जवळपास १७५-२०० पुस्तकांचे स्टॉल असून सगळे स्टॉल पुस्तक प्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. समेलनात पुस्तकांना मिळणारा वाचकांचा एकूण प्रतिसादाविषयी आम्ही काही स्टॉलधारकांशी सवांद साधला आणि त्यांची मते जाणून घेतली.
 

मॅजेस्टिक हाऊसचे सुरेश मोरजकर म्हणाले कि, ऐतिहासिक, चरित्रात्मक पुस्तकांची वाचकांकांडून मागणी सर्वाधिक आहे. ९२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे तसेच पु. ल. देशपांडे या लेखकांच्या पुस्तकाला मागणी जास्त आहे. आज पुस्तक प्रेमींचा प्रतिसाद आणखीनच वाढेल अशी अपेक्षा आहे. पण अधिकाधिक लोकांनी पुस्तक खरेदी केली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी महा MTB शी बोलताना व्यक्त केली.

 

राजहंस प्रकाशनाचे अमोल महादन म्हणाले कि, चरित्र, आत्मचरित्र, बालसाहित्य यांची वाचकांकडून अधिक मागणी आहे. आज व उद्या ही मागणी अजून वाढेल अशी अपेक्षाही त्यांनी बोलताना व्यक्त केली.

 

मेहता पब्लिकेशन्सच्या धनंजय माने यांनी मात्र यंदाच्या साहित्य संमेलनात गर्दी जास्त असल्याचे निरीक्षण मांडले. पुस्तक विकत घेऊन वाचणाऱ्यांची संख्या वाढल्याचे ते म्हणाले. संभाजी, ययाती या पुस्तकांना मागणी असल्याचे ते म्हणाले.

 

भाषेची खिचडी थांबवा - एका मराठी प्रेमीची तळमळ....

 

सध्या इंग्रजी तसेच हिंदी मिश्रीत मराठी भाषा बोलणारे आपल्याला सर्रास दिसतात. पण आपल्या मातृभाषेची होणारी खिचडी आपण थांबवलीच पाहिजे. त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करायला हवे, असे मत ७२ वर्षांच्या अरविंद पांडे यांनी महा MTBशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले कि, मराठी भाषा वाचवायची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासून करावी. मुलांना लहानपणापासून बालसाहित्याची गोडी लावावी. त्यांच्याशी मराठीतच संवाद साधावा. आपणही पुस्तक विकत घेऊन वाचावीत आणि पुढच्या पिढीला हि तशीच सवय लावावी.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@