आता मौलाना आझाद यांचा चरित्रपटही पडद्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2019
Total Views |



मुंबई : मौलाना आझाद यांच्या जीवनावर आधारित वो जो था एक मसीहाहा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मौलाना आझाद यांच्या प्रमुख भूमिकेत लीनेश फणसे झळकणार आहेत. याशिवाय सुधीर जोगळेकर, आरती गुप्ते, डॉ राजेंद्र संजय, अरविंद वेकारीया, शरद शहा, केटी मेंघानी, चेतन ठक्कर, सुनील बळवंत, माही सिंग, चांद अन्सारी आणि वीरेंद्र मिश्रा हे प्रमुख कलाकार या जीवनपटात भूमिका साकारणार आहेत.

 

येत्या १८ जानेवारी रोजी वो जो था एक मसीहाहा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचा जीवन संघर्ष यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील त्यांचा सहभाग अत्यंत प्रेरणादायी होता. देशभक्त म्हणून त्यांनी अरबिंदो घोष यांच्या क्रांतिकारी संघटनेचे सक्रिय सदस्यत्व स्वीकारले होते. याशिवाय पत्रकार म्हणून त्यांनी अल हिलालआणि अल बलाहही दोन मासिके चालविली आणि त्यांना उदंड प्रतिसाद मिळाला. ती एवढी लोकप्रिय झाली, की भीतीपोटी ब्रिटीश सरकारने ती दोन्ही प्रकाशने बंद केली आणि मौलाना आझाद यांना कलकत्ता येथून हद्दपार केले. त्यांना रांची येथे नजरबंद करून ठेवण्यात आले.

 

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी त्यांनी अनेकदा तुरुंगवास सहन केला. १९२३मध्ये वयाच्या ३५व्या वर्षी ते युवा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. स्वतंत्र हिंदुस्थानाचे शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी शिक्षणक्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणले. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे विषय दाखल केले. संपूर्ण आयुष्य हिंदू-मुस्लिमांच्या एकजुटीसाठी वेचले. त्यांचा हाच संघर्ष वो जो था एक मसीहाया चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@