चिमुकलीने कॉंग्रेसला शिकवली राफेलची ‘किंमत’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2019
Total Views |
 
 

नवी दिल्ली : राफेल करार महत्वाचा असतानाही कॉंग्रेसकडून सातत्याने याबाबत आक्षेप घेतला जात आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर निकाल केंद्र सरकारच्या बाजूने लागला आहे. तरीही राहुल गांधींना राफेल कराराचे महत्व कळत नसल्याने आता एका चिमुकलीने राफेल करार काय ते राहुल गांधींना समजाऊन सांगितले आहे. या आठ वर्षांच्या मुलीने राफेलबाबत राहुल गांधींना उद्देशून एक व्हिडिओ केला आहे. यामध्ये राफेल विमानाचा फरक तिने एका पेन्सिल बॉक्सच्या मदतीने समजावून सांगितला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून कॉंग्रेसवर टीका केली आहे.

 
 
 

राफेलवरून राहुल गांधी करत असलेल्या टीकेनंतर मोदी सरकारकडून राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला जात आहे. त्यामध्ये राहुल गांधींना राफेलमधले काय कळते?, अशा शब्दांत त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्यानंतर आता याच मुद्यावरून हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये ही चिमुकली सांगते की ''राफेल मुद्यावर मी काही सांगू इच्छिते. हे राहुल गांधींचे राफेल विमान आहे. ते आतून पूर्णपणे रिकामे आहे. याची किंमत ७२० कोटी आहे. तर हे मोदींचे विमान अत्याधुनिक शस्त्रांसह आहे. याची किंमत सोळाव्या कोटी रुपये आहे. ही राफेलची बेसिक किंमत आहे. तर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असणाऱ्या राफेलची किंमत वाढली आहे''.

 

हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यावर संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटवरून या चिमुकलीचे आभार मानले आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ''व्हिडिओ पोस्ट या मुलीचे धन्यवाद. तिने राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी प्रकरणात रुची दाखवली. माझ्या शुभेच्छा आहेत, की ती लढाऊ विमानाची एक प्रशिक्षित वैमानिक होईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@