साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी विद्या देवधर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2019
Total Views |



यवतमाळ : नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यावरून झालेल्या वादानंतर अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी राजीनामा दिला. त्यानंतर महामंडळाच्या अध्यक्षपदी विद्या देवधर यांची निवड करण्यात आली आहे. त्यापूर्वी त्यांच्याकडे महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची धुरा होती.

 

सहगल प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत श्रीपाद जोशी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर महामंडळाच्या घटनेप्रमाणे व श्रीपाद जोशी यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात नमूद केल्याप्रमाणे महामंडळाच्या अध्यक्षपदी विद्या देवधर यांची निवड करण्यात आली. गुरुवारी यवतमाळ येथे झालेल्या महामंडळाच्या बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच, श्रीपाद जोशी यांचा राजीनामाही या बैठकीत स्वीकारण्यात आला. “मी गेली १८ वर्षे महामंडळाचे काम पाहते आहे. त्यामुळे महामंडळाच्या इतर सदस्यांनी माझ्या निवडीचे स्वागत केले,” अशी प्रतिक्रिया विद्या देवधर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’सोबत बोलताना दिली.

 

सकारात्मक विचारांनी साहित्यिकांनी या संमेलनात सहभागी व्हावे व श्रोत्यांनीही या संमेलनाला मोठी उपस्थिती दर्शवावी,” असे आवाहनही देवधर यांनी यावेळी केले. यवतमाळमध्ये शुक्रवार, दि. ११ जानेवारी रोजी होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला करणार असल्याचेही देवधर यांनी सांगितले. शेतकरी महिला वैशाली सुधाकर येडे (रा. कळंब, ता. राजूर) यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती देवधर यांनी दिली.

 

“साहित्य महामंडळात काम करण्याचा गेल्या १८ वर्षांचा अनुभव माझ्याकडे आहे. संमेलनांची कार्यवाही मी जवळून पाहिली आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी समन्वयाची भूमिका घेतली आहे, त्यामुळे हे संमेलन यशस्वी होईल, असा मला विश्वास वाटतो.”

 

विद्या देवधर,

अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@