पांड्या प्रकरणावर कोहली म्हणाला 'हे'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2019
Total Views |



मुंबई - 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमामध्ये महिलांबद्दल वादग्रस्त विधाने केल्याबद्दल हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुल यांच्यावर टीकेची झोड उठली होती. यानंतर हार्दिकने माफीही मागितली होती. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने यावर लक्ष देताना दोघांवर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. आता भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने यावर बोलताना सांगितले की, "प्रशासकीय समितीचा निर्णय आल्यानंतर दोघांना संघात घेतले जाणार आहे."

 

हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांच्यावर बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख २ एकदिवसीय सामन्यात बंदी घालण्याची शिफारस केली आहे. तर, डायना एडुलजी यांनी हे प्रकरण लीगल सेल यांच्याकडे पाठवले आहे. दोन्ही खेळाडूंवर बंदीची कारवाई होण्याचीही शक्यता आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पत्रकार परिषदेत म्हणाला की, "भारतीय संघाचे सहकारी असल्यामुळे आम्ही त्यांच्या विधानाचे समर्थन करत नाही. ते त्यांचे वैयक्तीक विचार आहेत. संघाचा विचार केल्यास यानंतरही त्यांच्यासोबत ड्रेसिंग रुममध्ये कोणताही फरक होणार नाही."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@