LIVE साहित्य संमेलन : झुंडशाहीच्या धमक्यांपुढे वाकणं हे आज परवडणारं नव्हे : अरुणा ढेरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2019
Total Views |
 

यवतमाळ अडचणीच्या काळात दिल्लीतली नाय, गल्लीतली बाय कामी येते, असे उद्गार आत्महत्या केलेल्या शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी यांनी ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनात काढले.माझा या जन्मावर विश्वास आहेत्यामुळे मी रडत नाय तर लढतेय, असे भावोद्गार त्यांनी काढले.पुढच्या जन्मी अदानी, अंबानी होईन, असे वाटून पतीने आत्महत्या केली होती. खरी पण मी हीच वायद्याची शेती, फायद्याची करून दाखवेन, असा विश्वास मला आहे, असे त्यांनी नमूद केले.

 

  • संमेलनाध्यक्षा अरुणा ढेरेंच्या भाषणाला सुरुवात
  • अरुणा ढेरे यांच्या भाषणाचे मुद्दे
  • जाज्वल्य हवे तुमचे विचार भाषा नको हा वारसा घेऊनच मी इथवर आले
  • संमेलनाला वेठीला धरणाऱ्यांचे आपण बळी ठरलो.
  • साहित्य संमेलन ही विचारांची पंढरी आहे.
  • झुंडशाहीच्या धमक्यांपुढे वाकणं हे आज परवडणारा नव्हे : अरुणा ढेरे
  • नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे ही आयोजकांची मोठी चूक

 
 
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभास सुरुवात झाली असून संमेलनाच्या उद्घाटिका वैशाली येडे यांच्या हस्ते रिमोटद्वारे दीपप्रज्वलन करण्यात आले. संमेलनाध्यक्षा अरूणा ढेरे, उद्घाटिका वैशाली येडे, महामंडळध्यक्षा विद्या देवधर, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, पालकमंत्री मदन येरावार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, व्यासपीठावर उपस्थित आहेत. आज सकाळी ९ वाजता ग्रंथ दिंडीने साहित्य संमेलनाला सुरूवात करण्यात आली. 

 
 
९२ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी पार पडले. संमेलनाच्या उद्घाटिका वैशाली येडे, मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, संमेलन अध्यक्षा अरुणा ढेरे, कांचन चौधरी, महामंडळाच्या उपाध्यक्ष विद्या देवधर आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. ग्रंथ प्रदर्शन पार पडल्यानंतर आता वाचकांनी पुस्त दालनांत मोठी गर्दी होत आहे. संमेलनाच्या उद्घाटनाकडे साहित्यिकांचे लक्ष लागले आहे.
 

यवतमाळमध्ये होत असलेले ९२ वे साहित्य संमेलन वादग्रस्त ठरले होते. मात्र, शुक्रवारी नियोजित कार्यक्रमानुसार सकाळी ग्रंथ दिंडी निघाली आणि वाजत गाजत संमेलन स्थळी पोहोचली. साहित्य रसिकांचा उत्साह यावेळी ओसंडून वाहत होत. त्यानंतर ध्वजारोहन होऊन ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटनही पार पडले. दुपारी ४ वाजता मुख्य संमेलनाच्या उद्घाटन होणार आहे, संमेलनाचे उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नी वैशाली येडे या करणार असून मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख संमेलनाची सूत्रे डॉ. अरुणा ढेरे यांच्याकडे देणार आहेत.

 

वैशाली येडे यांनी भाषण करण्याचे ठरवले आहे, त्यानुसार शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये, आत्महत्येनंतर त्यांच्या मागे असलेल्या मुलाबाळांची, पत्नी आणि कुटुंबियांची अवस्था वाईट होते आदी सांगण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न आणि व्यथा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मांडण्यास मदत होईल, असे विश्वास आयोजकांना आहे. या कार्यक्रमाला मराठी भाषा व सांस्कृतीक कार्य मंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्याही भाषणाची उत्सुकता साऱ्यांना आहे.

 

यवतमाळ, ९२ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन अपडेट्स

वैशाली येडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन 
 
संमेलन अध्यक्षा डॉ. अरुणा ढेेरे यांच्या भाषणाची उत्सूकता  
 
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सर्व साहित्यिकांनी अभिवादन
 
 सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तक प्रदर्शानेचेही उद्घाटन पार पडले.
 
 पुस्तक प्रदर्शनात देशातील अनेक प्रकाशनांचे पुस्तके मांडण्यात आलेत.
 
 यवतमाळच्या नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
 
 साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीचा समारोप राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरीत

     उद्घाटिका वैशाली येडे, संमेलना अध्यक्षा अरुणा ढेरे, कांचन चौधरी, महामंडळाच्या अध्यक्षा विद्या देवधर व जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

 
@@AUTHORINFO_V1@@