पाटबंधारे अधिकाऱ्यांसह तज्ञांशी चर्चेनंतर पाण्याचे नियोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2019
Total Views |



पुणेपुणेकरांनी पाण्याचा वापर जपून करण्याची गरज असून गाड्या धुवायला, गार्डनमध्ये पाण्याचा वापर आणि बांधकामासाठी शुद्ध पाणी वापरु नये. पुण्याच्या पाण्याबाबत पाटबंधारे अधिकारी आणि तज्ञांशी बोलून पाण्यासंदर्भात नियोजन केले जाईल.” असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. पाटबंधारे विभाग तसेच महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शहराच्या पाणीसाठा २०० एमएलडीने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापालिकेतील पदाधिकारी व सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली.

 

पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा आणि त्याचा वापर लक्षात घेता पाणी कपात करावी लागेल. मात्र, त्याबाबतचा निर्णय पुढील महिन्यात घेऊ, असे सांगून पुढील काही दिवस पाणीकपात होणार नाही.” असे पालकमंत्री बापट यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तूर्तास पाणी कपात होणार नाही. पाण्याच्या गैरवापरावर नजर ठेवण्याचा आदेशही बापट यांनी महापालिकेला दिला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@