सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाला मंजुरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2019
Total Views |



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले केंद्र शासनाचे आभार

 

मुंबई : सोलापूर आणि उस्मानाबाद या शहरांना तुळजापूरमार्गे जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाची निर्मिती करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोलापूर दौऱ्यात याबाबत घोषणा केली. या महत्वाच्या रेल्वेमार्गाला पंतप्रधानांनी तात्काळ मान्यता दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या रेल्वेमार्गाची रेल्वे मंत्रालयाकडे मागणी होती.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मागणीला रेल्वे मंत्रालयाने तात्काळ मंजुरी दिल्याने तुळजापूर भागातील नागरिकांची मागील कित्येक वर्षांची रेल्वे मार्गाची मागणी पूर्ण होणार आहे. याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासालाही या नव्या रेल्वेमार्गाच्या निर्मितीमुळे मोठी चालना मिळणार आहे. सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गासाठी सुमारे ९०४.९२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी राज्य आणि केंद्र शासन ५०:५० या प्रमाणात खर्चाचा भार उचलणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@