‘होते कुरुप वेडे’च्या निमित्ताने जुळला 'हा' योग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
मुंबई : अभिनेता संजय नार्वेकर हे रंगभूमीवरील आपला रौप्य महोत्सव साजरा करण्यास सज्ज आहे. ‘होते कुरुप वेडे’ हे संजय नार्वेकर यांचे २५ वे नाटक आहे. विशेष म्हणजे या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे यांचेदेखील हे २५ वे नाटक आहे. बाह्य सौंदर्यापेक्षा मनाचे सौंदर्य जपायला हवे. ते महत्वाचे असते. असा संदेश या नाटकातून देण्यात आला आहे.
 

रंगभूमीवर हा विलक्षण योग जुळून आल्याबद्दल राजेश देशपांडे सांगतात की, आम्हा दोघांची ही रंगभूमीवरील पंचवीशी असली तरी ती ‘गद्धे पंचवीशी’ नक्कीच नाही. आम्हाला प्रगल्भ करणारी अशी ही पंचवीशी आहे. हा योग जुळून आल्यामुळे आम्हाला आनंद होत आहे. संजय नार्वेकर यांच्यामध्ये असलेली ऊर्जा ही सगळ्यांनाच सकारात्मक प्रोत्साहन देणारी असते. इतक्या वर्षांचा रंगभूमीचा आम्हा दोघांना असलेला हा अनुभव या नाटकाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल.” ‘होते कुरुप वेडे या नाटकात संजय नार्वेकर यांची प्रमुख भूमिका आहे.

 

 
 
अभिनेता संजय नार्वेकर आणि लेखक-दिग्दर्शक राजेश देशपांडे 
 

मी पहिले नाटक जेव्हा केले तेव्हा हे माझेच क्षेत्र आहे, असा आत्मविश्वास मला होता. मी इथेच काहीतरी उत्तम करू शकेन. माझ्यातील राजहंस मोठा होण्यासाठी बरीच वर्षे जावी लागली. त्यामागे खूप मेहनत आहे. नाटकाचा लेखक-दिग्दर्शक तुमचा मित्र असल्याने काम करणे सोपे जाते. राजेशला माझ्याकडून नेमके काय हवे आहे? हे मला चांगलेच माहिती आहे. तसेच मी राजेशला काय देऊ शकतो. याची त्याला खात्री आहे. याचा उपयोग तुमची कलाकृती उत्तम बनण्यासाठी होतो. असे संजय नार्वेकर यांनी म्हटले. दादर येथील शिवाजी मंदिर येथे ११ जानेवारी रोजी दुपारी ३:३० वाजता ‘होते कुरुप वेडे’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@