बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाविरोधात याचिका दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2019
Total Views |




मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महापौर बंगल्यात होणाऱ्या स्मारकाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये याचिकाकर्त्याने स्मारक बांधण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. "स्मारक बांधण्याची प्रस्तावित जागा ही हरित जमिनीमध्ये मोडत असून त्यामुळे (सीआरझेड) किनारी क्षेत्र नियमांचे उल्लंघन होत आहे."असे याचिकाकर्ते संतोष दौंडकर यांचे म्हणणे आहे.

 

दादर येथे महापौर निवासस्थान आहे. या बंगल्याच्या आवारामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधण्याचे प्रस्तावित आहे. राज्य सरकारने याआधीही स्मारक बांधण्याच्या विरोधात येणाऱ्या याचिका रद्द करण्याची मागणी एका प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. तसेच न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्यांना दंड करावा असे सरकारने सांगितले होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@