भारतीय सिनेमा आणि मालिकांमुळे संस्कृतीला धोका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2019
Total Views |

 

 
 
 
 
 

 पाकिस्तानच्या न्यायालयाची मुक्ताफळे

 
 
पाकिस्तान : भारतीय सिनेमा आणि मालिकांचे पाकिस्तानात प्रक्षेपण करण्यास पाकिस्तानच्या न्यायालयाने नकार दिला आहे. पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश साकिब निसार यांनी हा नकार दिला. पाकिस्तानातील टीव्हीवर भारतीय सिनेमे आणि मालिका दाखविणे हे पाकिस्तानच्या संस्कृतीला धोकादायक आहे. असे पाकिस्तानच्या न्यायालयाने म्हटले आहे. पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी ऑथॉरिटीने (पेम्रा)ने याप्रकरणी याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने आपले हे मत नोंदविले.
 

पाकिस्तानी उच्च न्यायालयाने टीव्ही चॅनेल्सवर भारतीय आशय दाखविण्यास बंदी घातली आहे. या बंदी विरोधात पेम्राने पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी पार पडली. न्यायालयाने ही बंदी उठविण्यास नकार दिला. पाकिस्तानी उच्च न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती देण्याआधीच परदेशी आशयावर बंदी घातली होती. पेम्राचे वकील जफर इकबाल यांनी ही माहिती न्यायालयाला दिली. पाकिस्तानातील फिल्माझिया या चॅनेलवर दाखविण्यात येणारा ६५ टक्के आशय हा परदेशी असून त्याचे प्रमाण आता ८० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. असे पेम्राचे अध्यक्ष सलीम बेग यांनी न्यायालयाला सांगितले.

 

या सगळ्या युक्तिवादानंतर भारतीय आशय पाकिस्तानी टीव्हीवर दाखवण्याची परवानगी दिली जाणार नाही. असे न्यायालयाने स्पष्ट केले. फिल्माझिया हा एक मनोरंजन चॅनेल असून तो काही न्यूज चॅनेल नाही. या चॅनेलवर कोणताही प्रकारचा प्रचार केला जात नाही. असे सलीम बेग यांनी न्यायालयाला सांगितले. परंतु भारतीय आशय असलेल्या सिनेमा आणि मालिकांमुळे पाकिस्तानच्या संस्कृतीला धोका असल्याचे सांगत न्यायाधीशांनी प्रक्षेपणास नकार दिला. फेब्रुवारी महिन्यात याप्रकरणी पुढील सुनावणी करण्यात येणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@