विराट, बुमराहची नं. १ कामगिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2019
Total Views |



नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत आपला बोलबाला कायम ठेवला आहे. आयसीसीने नुकतीच ताजी जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे. या फलंदाजीच्या क्रमवारीत विराट कोहली ८९९ गुणांसह तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह ८४१ गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहेत.

 

गोलंदाजांच्या यादीत अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशीद खान दुसऱ्या तर कुलदीप यादव तिसऱ्या क्रमांकावर आहे. फलंदाजीत भारतीय उपकर्णधार रोहित शर्मा ८७१ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू रॉस टेलरने मोठी झेप घेत ८२३ गुणांसह तिसरे स्थान काबीज केले आहे.

 

... तर भारताचा संघसुद्धा पटकावले अग्रस्थान

 

आगामी ८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ओळीने विजय मिळवला, तर भारताला आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचे स्थान गाठता येईल. या क्रमवारीत सध्या इंग्लंड १२६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाच्या खात्यात १२१ गुण आहेत. ऑस्ट्रेलियात ३ आणि न्यूझीलंडमध्ये ५ असे ८ एकदिवसीय सामने ओळीने जिंकल्यास भारताच्या खात्यात १२५ गुण होतील. न्यूझीलंड ११३ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@