नव्या वर्षात मिळाली लोकलमध्येच ‘गुडन्यूज’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2019
Total Views |
 

विरार डहाणू लोकलमध्ये महिलेने दिला जुळ्यांना जन्म

 

पालघर : विरार-डहाणू लोकलमध्ये एका महिलेने मंगळवारी नववर्षाच्या पहिल्या दिवशी एका बाळाला जन्म दिला आहे. दरम्यान तिला पालघर रेल्वे स्थानकाच्या प्रतीक्षालयात नेले असता तिच्या दुसऱ्या बाळाचाही जन्म झाला. पालघर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टरांनी रेल्वे स्थानकात जाऊन प्रतीक्षालयात ही प्रसूती केली. माता व दोन्ही मुले सुखरुप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

 

पालघरमध्ये राहणाऱ्या छाया सवरा (२०) यांना मंगळवारी सकाळच्या सुमारास प्रसूतीकळा येऊ लागल्या. तिच्या पतीने तिला सफाळेतील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, प्रसूतीमध्ये अडचणी येणार असल्याने तिला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यास तेथील डॉक्टरांनी सांगितले. वेळ कमी असल्यामुळे तिचा पती अंकुश व सासू कमली यांनी तिला रेल्वेने नेण्याचा निर्णय केला. सकाळीच नऊ वाजता विरार-डहाणू लोकलमध्ये छायाला पालघर येथे नेत असताना पालघर स्थानकानजीक लोकलमध्ये तिने यातील एका बाळाला जन्म दिला. या घटनेची माहिती पालघर रेल्वे स्थानकाच्या कार्यालयास देण्यात आली. त्यानुसार स्टेशन मास्तरांपासून ते लोहमार्ग पोलीस, स्थानक सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजण कामाला लागले.

 

रेल्वे स्थाकावर पालघर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. सफाई कर्मचारी यांनी प्रसूतीची गरज लक्षात घेता संपूर्ण प्रतिक्षालय स्वच्छ केले तर पोलिसांनी यात आपली चोख भूमिका बजावली. प्रतिक्षालयात तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. रेल्वे प्रवशांची मदतही यावेळी महत्वाची बजावली. दरम्यान, दोन्ही बाळ व माता यांची प्रकृती आता चांगली असल्याची पुष्टी डॉक्टरांनी केली आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@