ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2019
Total Views |
 
 

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे  मंगळवार,  दि. जानेवारी रोजी सकाळी कॅनडातील रुग्णालयात निधन झाले. ते ८१ वर्षाचे होते. काही दिवसांपासून ते आजारपणाशी झुंज देत होते. दरम्यान, त्यांच्या जाण्याने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

 

कादर खान यांनी आपल्या अभिजात अभिनयाने चाहत्यांवर छाप पाडली होती. खान यांची प्रकृती काही दिवसांपासून गंभीर होती. त्यांना श्वासोच्छश्वासाचा त्रास होत होता. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कादर खान यांचे निधन झाल्याची बातमी व्हायरल झाली होती.

 

नेकांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली होती. त्यानंतर त्यांच्या मुलाने त्यांच्या निधनाचे वृत्त फेटाळून लावत या केवळ अफवा असल्याचे म्हटले होते. कादर खान यांनी आतापर्यंत तिनशेहून अधिक चित्रपटांत काम केले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते चित्रपटसृष्टीपासून लांब होते.

 

दरम्यान, हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते, विनोदी कलाकार,पटकथालेखक आणि दिग्दर्शक कादर खान यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील अष्टपैलू कलाकार गमावला आहे, या शब्दात त्यांना सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. कादर खान यांनी अनेक सुप्रसिद्ध हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या असून उत्तम दिग्दर्शन आणि पटकथा लेखन केले आहे. त्यांच्या विनोदी भूमिका रसिकांमध्ये अधिक लोकप्रिय ठरल्या. त्यांच्या निधनाने अभिनय क्षेत्रातील नवीन पिढीमध्ये पोकळी निर्माण झाली असून हिंदी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@