‘कुटुंब रंगलय काव्यात’ चा ३००० वा महोत्सवी प्रयोग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2019
Total Views |



 
 
 
मुंबई : 'कुटुंब रंगलय काव्यात' या एकपात्री काव्यनाट्यानुभवाचा ३००० वा महोत्सवी कार्यक्रम होणार आहे. 'वाक्यम रसात्मकं काव्यं’- ‘रसपूर्ण वाक्याला काव्य म्हणतात'. असे म्हणत गेली ३८ वर्षे रसपूर्ण काव्यांची ही गंगा अविरतपणे रसिकांसमोर आणण्याचे काम विसुभाऊ बापट करत आहेत. ‘ओमकार साधना, मुंबई’ निर्मित 'कुटुंब रंगलय काव्यात' या एकपात्री काव्यनाट्यानुभवाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कवितेचे बीज नव्याने रोवले आहे. अनेक प्रस्थापित, नवोदित कवींच्या अनेक प्रकाशित आणि अप्रकाशित कवितांचा संच घेऊन गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून विसुभाऊ बापट 'कुटुंब रंगलय काव्यात' हा एकपात्री कार्यक्रम सादर करत आहेत. एकाही कवितेची पुनरावृत्ती न करता कविता पाठ करून सलग ११ तास आणि १५ तास कवितांचे सादरीकरण करण्याचा विक्रम विसूभाऊंच्या नावावर आहे.
 

विसूभाऊंच्या या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा आता रोवला जाणार आहे. अविरत प्रतिष्ठानआणि क्वालिटी ट्रॅव्हल वर्ल्डयांच्या संयुक्त विद्यमानाने 'कुटुंब रंगलय काव्यात' या एकपात्री काव्यनाट्यानुभवाचा ३००० वा महोत्सवी कार्यक्रम होणार आहे. या रविवारी ६ जानेवारी रोजी रात्री ८.०० वाजता दादर येथील शिवाजी मंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. लोकमान्य मल्टिपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि औदुंबर आर्टस् हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विसुभाऊ बापट हे त्यांच्या शब्द आणि सुरांच्या माध्यमातून, रसिक प्रेक्षकांना कवितेच्या अद्भुत जगाची सफर घडवणार आहेत.

 

या विशेष कार्यक्रमासाठी दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहाच्या पहिल्या चार रांगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नाट्यगृहाच्या बाल्कनीच्या प्रवेशिका विनामूल्य उपलब्ध आहेत. ३ जानेवारीपासून प्रवेशिका नाट्यगृहावर उपलब्ध होतील. 'जे न देखे रवी ते देखे कवी' असे म्हटले जाते. त्यामुळे निरनिराळ्या कवींच्या दृष्टीतून हे जग जाणण्यासाठी तसेच कवितेच्या या जगाची एक झलक 'कुटुंब रंगलय काव्यात' या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
@@AUTHORINFO_V1@@