पुण्यात आजपासून हेल्मेटसक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2019
Total Views |

 


 
 
 
पुणे : पुण्यामध्ये १ जानेवारीपासून हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी पुण्यामध्ये हेल्मेटसक्तीच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. परंतु पुण्यातील विविध संघटना, संस्था आणि काही राजकीय पक्षांनी या हेल्मेटसक्तीला विरोध केला आहे.
 

पुण्यात १ जानेवारी २०१९ पासून लागू होणाऱ्या या हेल्मेटसक्तीला विरोध करण्यासाठी पुणेकर ३ जानेवारी रोजी विनाहेल्मेट दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. पुण्यातील पत्रकार संघापासून ही विनाहेल्मेट दुचाकी रॅली काढण्यात येणार असून ती पुणे पोलीस आयुक्तालयापर्यंत असणार आहे. या रॅलीनंतर पुणे पोलास आयुक्त के.व्यंकटेशम यांना निवेदन देण्यात येणार आहे. पुण्यातील हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हेल्मेटसक्तीला सुरुवातीपासूनच पुणेकरांनी विरोध केला आहे. १ जानेवारीपासून हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्याची घोषणा पोलीस आयुक्तांनी केल्यापासूनच पुणेकरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ही हेल्मेटसक्ती हटविण्यासाठी हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीने पालकमंत्री गिरीश बापट यांना यापूर्वी निवेदन दिले होते.

 

हेल्मेट वापरण्याला विरोध नसून हेल्मेटसक्तीला विरोध असल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे. वाहतूकीच्या इतर नियमांचे पुणेकर काटेकोरपणे पालन करत असून त्यांना हेल्मेटसक्तीतून मुक्तता द्यावी. अशी मागणी या कृती समितीने केली आहे. हेल्मेट न घातल्यामुळे देशभरात एकूण ३५ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही दुचाकीस्वार हेल्मेट वापरत नाहीत. त्यामुळे पुण्यात हा हेल्मेटसक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
@@AUTHORINFO_V1@@