अभिनेते प्रकाश राज लढवणार लोकसभा निवडणूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-2019
Total Views |


 
 
 
 
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि कमलहसन यांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनेते प्रकाश राज यांनीदेखील राजकारणात प्रवेश केला आहे. अभिनेते प्रकाश राज यांनी यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. परंतु ते कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
 
 
 
 

प्रकाश राज हे दक्षिणेतील एक नावाजलेले अभिनेते असून त्यांनी 'सिंघम' या सिनेमामध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना प्रकाश राज यांनी ट्विटरवरून याबदद्ल माहिती दिली. तुमच्या पाठिंबामुळेच मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे. लवकरच मी माझ्या मतदार संघाबाबत माहिती देईन.” असे त्यांनी ट्विट केले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
@@AUTHORINFO_V1@@