पत्नीला थांबवण्यासाठी विमान पाच तास रोखले!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2018
Total Views |



मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला फोन करून विमानात बॉम्ब असल्याची खोटी माहिती देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. आरोपी गोरेगावमध्ये राहणारा असून देश सोडून जात असलेल्या पत्नीला थांबवण्यासाठी विमानात बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिल्याचे चौकशीत उघड झाले आहे. यामुळे विमान उड्डाणाला तब्बल पाच तास उशीर झाला.

 

गोरेगावमध्ये राहणाऱ्या वासिम कुरेशीची (वय 30) पत्नी तिच्या मायदेशी फिलिपाईन्सला जात होती. याआधी दोघांमध्ये वाद झाला होता. वासिम आणि त्याची पत्नी यांची भेट दुबईत झाली होती. वासिम दुबईत एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करायचा. मात्र, त्याची नोकरी गेल्याने दोघांमध्ये वाद व्हायचे. त्यामुळेच वासिमची पत्नी सिंगापूरमार्गे फिलिपाईन्सला जाण्यासाठी निघाली होती. तिला थांबवण्यासाठी वासिमने विमानात बॉम्ब असल्याची खोटी माहिती विमानतळ प्रशासनाला दिली. विमानात ठेवण्यात आलेल्या सामानाची पुन्हा तपासणी सुरू करण्यात आली. यामुळे विमानाच्या उड्डाणात पाच तासांचा विलंब झाला. वासिम कुरेशीने पहिला दूरध्वनी विमानतळाच्या सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर यंत्रणेला केला होता, अशी माहिती सहारा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानी दिली. “हवाई गुप्तचर यंत्रणेला शुक्रवार, दि. 7 रोजी रात्री साडेआठ वाजता वासिमने संपर्क केला, तर विमानतळाच्या ग्राहक सेवा केंद्राला साडेनऊ वाजता त्याने दुसऱ्या दा दूरध्वनी केला. सुरुवातीला केलेल्या दुरध्वनीत ‘सिंगापूर एअरलाईन्स’मधून एक प्रवासी 500 ग्रॅम सोने अवैधपणे नेत असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, त्यामुळे विमान थांबले नाही. त्यामुळे वासिमने दुसऱ्या दा संपर्क करत विमानात बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिली. यामुळे विमानाचे उड्डाण थांबवण्यात आले,” अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@