वाड्यात अटल बिहारी वाजपेयी यांचे उभे राहणार स्मारक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2018
Total Views |



स्वामी विवेकानंद विद्यालयात उभारणार स्मारक

वाडा: भारतरत्न व देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मारक वाडा येथे बनत असून त्याचे भूमिपूजन 11 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या प्रांगणात हे स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे नेते व वाजपेयी बरोबर राहिलेले ओमप्रकाश शर्मा यांनी दिली.

 

वाडा येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या प्रांगणात 26 /11/2008 रोजीच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे स्मारक असून त्याला लागूनच हे स्मारक बनणार असून त्याचे भूमिपूजन आदिवासी विकास मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोकण विभागाचे पोलिस महानिरीक्षक नवल बजाज व भाजपा चे जेष्ठ नेते बाबाजी कठोले हे उपस्थित राहणार आहेत.

 

दिवंगत वाजपेयी यांनी 1977 ला वाडा व 1993 ला पोंदा हायस्कूल डहाणू येथे भेट दिली तद्नंतर 2004 मध्ये त्यांनी जव्हार येथे भेट देऊन एका सभेस संबोधित केले होते. आदिवासी बांधवांवर त्यांचे अतोनात प्रेम होते व त्यांना श्रद्धांजली म्हणून ग्रामीण भागात हे स्मारक उभे राहत राहत आहे. बहुधा वाजपेयी यांचे राज्यातील पहिले स्मारक ठरेल. याचे अनावरण 25 डिसेंबर 2018 रोजी वाजपेयी यांच्या वाढदिवशी करण्याचे ठरविले असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे हस्ते होणार असून त्यांनी त्यास संमती दिली असल्याची माहिती भाजपा चे जेष्ठ नेते ओमप्रकाश शर्मा यांनी दिली.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@