डोंबिवली पादचारी पुलावरील फेब्रिक छत उभारणीचे काम अर्धवटच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2018
Total Views |



डोंबिवली : पश्चिमेतील स्टेशनचा पादचारी पुलावर यापूर्वी छत नव्हते ,त्यामुळे नागरिकांना ऊन – पावसाचा सामना करावा लागत असायचा.हि समस्या दूर करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने टेन्साईल फेब्रीक्सचे छत उभारण्याचे काम टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय घेतला .त्यानुसार गेली दोन वर्षे हे काम सुरु होते. पूर्व विभागातील संपूर्ण काम केव्हाच झाले आहे .मात्र पश्चिम विभागातील मासळी मार्केट कडील भागाच्या पादचारी पुलावर छत उभारणीचे काम न केल्याने पश्चिम डोंबिवलीकरांमध्ये नाराजी पसरली आहे .

 

गर्दीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी २००५ च्या सुमारास पादचारी पूल उभारला .मात्र त्या पुलावर ऊन पावसापासून नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी छत वा शेड उभारण्यात आली नव्हती .त्यामुळे विशेषतः पावसाळ्यात नागरिकांना जास्त त्रास व्हायचा .मोठा पाऊस सुरु असेल तर अनेक नागरिकांना रेल्वे पुलावरच थांबून राहावे लागायचे , परिणामी रेल्वे पुलावर गर्दी व्हायची .हीच अडचण लक्षात घेवून पालिकेने या पुलावर शेड उभारणी करण्याचा निर्णय घेतला. स्टेशन पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पादचारी पुलाची लांबी सुमारे ५०० मीटर आहे .या पुलावर जर्मन तंत्रज्ञान आणि टेन्साईल फेब्रीक्स मटेरियल वापरून उष्णता प्रतिबंधक आणि आग प्रतिबंधक तसेच वजनाने हलकी आणि आकर्षक असलेली शेड उभारण्यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे .हे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत असून ज्या ठिकाणी काम करायचे आहे तेव्हढा भाग काम पूर्ण होईपर्यंत रहदारीस बंद करण्यात येत असतो. अशाप्रकारे प्रथम डोंबिवली पश्चिमेतील द्वारका हॉटेल जवळील पादचारी पुलाच्या भागावर शेड उभारणीचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे .त्यानंतर डोंबिवली पूर्वेतील पाटकर रोडवरील पादचारी पुलाच्या भागावर शेड उभारणीचे काम २० डिसेंबर २०१६ रोजी पूर्ण करण्यात आले .पाटकर रोडवरील पादचारी पुलावर छत उभारण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर डोंबिवली पश्चिमेतील मच्छी मार्केट जवळील पादचारी पुलावर शेड उभारणीचे काम हाती घेतले जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले होते .मात्र गेले वर्षभर प्रशासनाकडून त्याबाबत कोणतीच हालचाल करण्यात आलेली नाही .विशेष म्हणजे कामाचे श्रेय घेण्यासाठी स्पर्धा करणारे नगरसेवक देखील शांत बसले आहेत .या कामाच्या निविदा प्रक्रिया पार पडल्या असून सुद्धा या कामाला होणारी दिरंगाई बद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@