मेट्रो कामांची माहिती आकाशवाणीवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2018
Total Views |





मुंबई: ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ या ‘मेट्रो-3’ प्रकल्पाच्या कामाची माहिती मुंबईकरांना वेळोवेळी मिळावी म्हणून ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ आता आकाशवाणीच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहे. आठवड्यातून दोन दिवस ‘मेट्रो-3’ चा लेखाजोखा या कार्यक्रमात मांडला जाणार आहे.

 

‘मेट्रो-3’च्या भुयारीकरणाचे किती काम पूर्ण झाले?, पुढील कामाची दिशा कशी असेल?, कोणत्या टप्प्यात काम सुरू आहे? किंवा होणार आहे?, आव्हाने कोणती आहेत? यांविषयी आकाशवाणीवरील कार्यक्रमामध्ये माहिती देण्यात येणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे. आकाशवाणीच्या ‘एफएम गोल्ड’ वाहिनीवर दर मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी सव्वादहा वाजता, तर ‘एफएम रेनबोवाहिनीवर दर बुधवारी व शुक्रवारी सकाळी सव्वासात वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

 

‘मेट्रो-3’ प्रकल्पांतर्गत 100 मीटरचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे. अनेक ठिकाणी भुयारे खोदणारी यंत्रे भूगर्भात उतरवण्यासाठी मोठ्या विहिरी खोदण्यात आल्या आहेत. टनेल बोअरिंगच्या साहाय्याने भुयारे खोदण्याचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी अजून कामाला सुरुवात झालेली नाही, त्या ठिकाणी येत्या काही दिवसांत कामाला सुरुवात होणार आहे. यासाठीची यंत्रे परदेशातून आयात करण्यात आली असून बहुसंख्य यंत्रे प्रकल्पस्थळी दाखल झाली आहेत, असे मेट्रो प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@