बँक अधिकाऱ्याच्या गायब होण्याचे गूढ उकले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2018
Total Views |




 

मुंबई: एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ किरण संघवी हे ५ सप्टेंबरपासून बेपत्ता होते. त्यांचा मोबाईल हा सतत चालू-बंद केला जात होता. यामुळे गुन्हेगार पकडणे हे नवी मुंबई पोलिसांसमोर एक आव्हान उभे राहिले होते. पण याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने संघवी यांच्या हत्येची कबुली दिली असून त्यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याचे त्याने सांगितले. त्यांचा मृतदेह अजून मिळाला नसून पोलीस शोध घेत आहेत.
 

काय आहे प्रकरण?

 

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष ३९ वर्षीय सिध्दार्थ संघवी ५ सप्टेंबरला मुंबईच्या कमला मिल कंपाऊडमधल्या एचडीएफसी बँकेच्या ऑफिसमधून बेपत्ता झाले होते. बुधवारी रात्री १० पर्यंत घरी पोहचले नाहीत म्हणून त्यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली होती. त्यामध्ये ते बुधवारी संद्याकाळी साडेसात वाजता ऑफिसबाहेर पडल्याचे दिसत होते. त्यानंतर, ६ सप्टेंबरला सिध्दार्थ यांची मारुती कार नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथे सापडली. या कारमध्ये रक्ताचे डाग आढळले होते. यामुळे त्यांच्या हत्येचा संशय बळावला होता.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@