पोळानिमित्त बैल धुताना पाच जणांचा बुडून मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2018
Total Views |


 


 


औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी वेगवेगळ्या चार गावांत पोळा सणानिमित्त बैल धूत असताना पाच मुलांचा जलसाठ्यांमध्ये बुडून मृत्यू झाला. या मृतांमध्ये दोन सख्या भावांचा समावेश आहे. यामुळे चारही गावांमध्ये पोळ्यादिवशी शोकाकुल वातावरण आहे.

 

खुलताबाद तालुक्यातील कनकशीळ गावामध्ये राहुल आबाराव म्हस्के या चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तो बैल धुण्यासाठी पाझर तलावात गेला असता तलावातील विहिरीचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर दुसरीकडे कन्नड शहरातील अंबाडी धरणामध्ये बैल धुताना कैलास बाविस्कर याचाही बुडून मृत्यू झाला. तो २४ वर्ष्याच्या होता, अशी माहिती कन्नड शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दिली.


 
 
तिसरी घटना देवगाव रंगारीनजीक माटेगाव शिवारातील छोट्या तलावात घडली. वडील आणि आजोबांसोबत बैल धुण्यासाठी गेलेला चौदा वर्षाचा नवनाथ गवळी याचाही बुडून दुर्दैवी अंत झाला. आठवीत शिकणारा नवनाथ हा एकुलता एक मुलगा होता. चौथी घटना हि वैजापूर तालुक्यातली आहे. अमोल रायते (१७ वर्षे)आणि ऋषिकेश रायते (२० वर्षे) हे दोन सख्ये भाऊ मुर्शिदापूर शिवारातील तलावात बैल धुण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. ग्रामस्थांनी दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@