सुक्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी वर्षाला पाच कोटी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2018
Total Views |



मुंबई: महापालिका क्षेत्रांमध्ये दरदिवशी निर्माण होणारा सुका कचरा उचलण्यासाठी महापालिकेच्यावतीने खासगी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. हे कंत्राट वर्षभरासाठी असणार आहे. कंत्राटदारांना सुका कचरा वाहून नेण्यासाठी तब्ब्ल साडेपाच कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. सुक्या कचऱ्या पासून उत्पन्न मिळण्याऐवजी केवळ कचऱा उचलण्यासाठी कोट्यवधी खर्च केले जाणार असल्याने पालिका प्रशासनावर टीका केली जात आहे.

 

कचऱ्या च्या विल्हेवाटीसाठी मुंबईत दररोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्या तून सुका कचरा वेगळा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी 24 प्रभाग कार्यालयांमध्ये 37 केंद्र निर्माण करण्यात आली आहे. निर्माण होणाऱ्या या सुक्या कचऱ्याची संस्थांच्या माध्यमातून विल्हेवाट लावली जाते. गोळा केलेला सुका कचरा केंद्रांमध्ये नेऊन विल्हेवाट लावण्याकरिता टाकण्यासाठी महापालिकेच्यावतीने खासगी टेम्पो भाड्याने घेण्यासाठी कंत्राटदारांची निवड केली आहे. हा कचरा वाहून नेण्यासाठी पाच कोटी 27 लाखांचे कंत्राट दिले जाणार आहे. 24 प्रभागांतील सुका कचरा वाहून नेण्यासाठी सात परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे सात कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@