प्रत्येकाला सन्मानाने मरण्याचा अधिकार आहे : सरन्यायाधीश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2018
Total Views |



 

पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांनी इच्छामरणाविषयी एक महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. 'कायद्यानुसार कोणीही आत्महत्या करू शकत नाही. मात्र प्रत्येकाला सन्मानाने मरण्याचा अधिकार आहे'. असे सरन्यायाधीश दिपक मिश्रा म्हणाले आहेत. पुण्यात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. ‘बॅलन्सिंग ऑफ कॉन्सिट्युशनल राइट्स’ या विषयावर ते बोलत होते.
 

'एखादी व्यक्ती आजाराने ग्रासलेली असेल व त्या व्यक्तीला इच्छामरण हवे असेल. तर ती व्यक्ती इच्छामरणाचे मृत्युपत्र बनवू शकते'. असे ते म्हणाले. तसेच 'अंतिम श्वास कधी घ्यायचा याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु त्या कोणाच्याही दबावाखाली येऊन ती व्यक्ती हे करत नसावी'. हेही त्यांनी स्पष्ट केले. याच वर्षी ९ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या खंडपीठाने इच्छामरणाविषयी ऐतिहासिक निर्णय दिला होता. इच्छामरणाच्या मृत्युपत्राविषयी मार्गदर्शक तत्वे या खंडपीठाने घालून दिली होती. तसेच शेवटचा श्वास कधी घ्यायचा याचा अधिकार मात्र मरणासन्न व्यक्तीलाच असेल असे नमूद करण्यात आले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@