येशूच्या नावाने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2018   
Total Views |


 
 

 

 
काश्मीर म्हटले की दहशतवादी त्यांच्या देशद्रोही कारवाया, काश्मीरमध्ये भयंकर पूर आल्यावर त्यांना वाचवणारे वीर भारतीय सैनिक, त्यानंतर पुन्हा पूर नियंत्रण झाल्यावर मदत केलेल्या भारतीय सैन्यावर दगडफेक करणारे काश्मीरमधले कृतघ्न फुटिरतावादी वगैरे वगैरे डोळ्यासमोर येतात. मात्र या सर्वांच्या पलीकडे काश्मीर चर्चेत आले आहे ते कठुआमुळे. कठुआमध्ये काही महिन्यांपूर्वी एका बालिकेवर अत्याचार झाला. त्याच कठुआमध्ये पारलीवंड या भागात चर्चशी संबंधित असलेले वसतिगृह चर्चेत आले आहे. हे वसतिगृह पठाणकोट येथील चर्चशी संबंधित आहे, अशी माहिती आहे. तसेच वसतिगृहाच्या मोकळ्या जागेत येशूची नियमित प्रार्थना केली जाई आणि परिसरातील ख्रिस्ती बांधव या प्रार्थनेला नित्यनियमाने येत. तर या वसतिगृहात या वसतिगृहाचा प्रमुख पाद्री अँथनी गेली चार वर्षे अल्पवयीन मुलांचे शोषण करत होता. पोलिसांनी कारवाई करत ७ ते १६ वर्षांच्या ८ मुलींची आणि १२ मुलांची या वसतिगृहातून सुटका केली. कोवळ्या जिवावर अत्याचार करणाऱ्या पाद्री अँथनीला पोलिसांनी अटक केली. सुटका केलेली ही अल्पवयीन मुले-मुली पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधली आहेत. घरी दारिद्रय, आपल्या मुलांना दोन वेळचे अन्न, डोक्यावर छत आणि मुख्य म्हणजे शिकायची संधी मिळेल या आशेपायी पालकांनी मुलांना कठुआच्या वसतिगृहामध्ये पाठवले होते. छे! दोनवेळच्या अन्नाच्या मोबदल्यात मानवतेला काळिमा फासत हा पाद्री या मुलांचे लैंगिक शोषण करत होता. भयंकर आणि शब्दातीत. या वसतिगृहात मुलांना मोफत राहण्याची आणि जेवणाची सोय होती म्हणे. हा खर्च केरळहून आलेला अँथनी कुठून करत असेल? नक्कीच यासाठी त्याला कोणी ना कोणी पैसे पुरवत असणार. असो, मुलांच्या शोषणाची घटना उजेडात आल्यानंतर पठाणकोटच्या चर्चने हे वसतिगृह आपले नाही, असे सांगितले. पण याच चर्चशी संबंध दर्शवत कठुआचे वसतिगृह उभे राहिले. दयाळू येशूच्या नावाखाली पारलीवंडच्या वसतिगृहामध्ये चालणाऱ्या निर्दयी-निर्घृण शोषणाची पाळेमुळे कुठे रूजली आहेत, हे उजेडात यायलाच हवे. दया-क्षमा-करुणेचा मुखवटा लावून अमानुषतेचे धंदे करणे बंद व्हायला हवे.
 

मानवतेचे शत्रू

 

सई येथे मानवी तस्करी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला अटक झाली आहे. बांगलादेशातील ५०० मुलींना नोकरीचे आमिष दाखवून त्याने इथे भारतात विकले आहे. हो, गुराढोरांसारखे विकले आहे. ५०० मुली वेश्याव्यवसायात ढकलल्या गेल्या. उफ्.. या मुली, त्यांचे मन, त्यांच्या भावना त्यांनी पाहिलेले उज्ज्वल भविष्याचे स्वप्न, सारे सारे कुस्करले गेले असेल त्यांच्या देहासारखे क्षणोक्षणी बळजबरीने. गरिबी आणि त्यातून आलेली लाचारी, जगण्याचा संघर्ष नव्हे पोटाची खळगी भरण्यासाठी केलेली तडजोड.. पण या गोष्टीला तडजोड तरी कसे म्हणावे? बांगलादेशातून बाहेर पडणाऱ्या या मुलींना कुठे माहिती होते की, त्यांना या दलदलीत जायचे आहे. त्यांना वाटले असेल नोकरी मिळेल, पगार मिळेल, पैसे मिळतील. जगणे त्यातल्या त्यात सोपे होईल पण त्यांच्या या इच्छेसाठी त्यांना भयंकर किंमत मोजावी लागली. या मुलींच्या आयुष्याचा नरक बनविणाऱ्या नराधमाला वसई येथून अटक झाली आहे. तो म्हणे, वसई, डोंबिवली-कल्याण वगैरे भागांतल्या उच्चभ्रू वस्तीत राहत असे. इतके समाजद्रोहीच नव्हे तर मानवतेला कलंक लावणारे कृत्य करणारा हा नीच माणूस राजरोसपणे चांगल्या पांढरपेशा वस्तीत राहायचा, पण तो कोण आहे? तो काय करतो, याची माहिती कुणाला नव्हती. मी भले, माझे घर भले. माझे जग घराच्या बंद दाराआडचे, ही मानसिकता समाजात वसलेली. त्यामुळेच तो आपले काळे कृत्य आरामात करत राहिला. असो तो पकडला गेला हे पण काही कमी नाही. या अनुषंगाने मुस्लीम राष्ट्र म्हणून घोषित केलेल्या बांगलादेशाचे सामाजिक वास्तव आणि तिथल्या मुलीबाळींचे जगणे डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. अर्थात हे फक्त बांगलादेशातच आहे असे नाही. आपल्या मुंबईतल्या देहविक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या भागात एक चक्कर टाकली तर तिथेही यापेक्षा वेगळे दृश्य नाही. इथेही फसवून, बळजबरीने किंवा स्वतः आईबापाने, नवऱ्याने विकलेल्या मुली बाजारात उभ्या असतात. पण खरे पाहिले तर तिथे त्या स्त्रिया विकायला उभ्या नसतात तर विकायला उभी असते नागरी समाजाची संवेदनशीलता, संस्कृतीच्या सभ्यतेची माणुसकी. स्त्रीला विकणारे आणि विकत घेणारे लोक. ते त्या विकल्या गेलेल्या स्त्रीचेच गुन्हेगार नाहीत तर संपूर्ण समाजाचे गुन्हेगार आहेत. मानवतेचे शत्रू आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@