बदलापुरात आदर्श वसुंधरा माता पुरस्कार वितरण सोहळा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2018
Total Views |



बदलापूर - मातृदिनानिमित्त बंगलोर येथील स्वाभिमान संस्थेचे चे संस्थापक श्री. व सौ. विजया व्यंकटरमण अय्यर आणि संरक्षण दलाच्या मार्गदर्शिका सौ. वैशाली म्हेत्रे यांना आदर्श वसुंधरा माता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. येथील आदर्श कला आणि वाणिज्य महाविद्यालय आणि पितांबरी यांचा संयुक्त विद्यमाने मातृदिनाचे औचित्य साधून "आदर्श वसुंधरा माता" पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे आदर्श महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. वैदेही दप्तरदार यांनी सांगितले.

 

मातृदिनानिमित्त दरवर्षी विविध संकल्पनेवर मातृदिन कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो. यंदा "आ चंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे" या संकल्पनेवर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या संकल्पनेवर मुंबई ठाणे परिसरातील लहान शिशु पासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांतील पारितोषिक प्राप्त काही विद्यार्थ्यांचे कार्यक्रम या सोहळ्यात सादर करण्यात येणार आहेत. आदर्श विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष जनार्दन घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सोमवार 10 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता आदर्श महाविद्यालयाचे नुतून सभागृहात हा मातृदिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@