नालासोपारा स्फोटक प्रकरणी दोघांना अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2018
Total Views |




जळगाव: मुंबईतील एटीएस पथकाने शनिवारी रात्री दोघांना जळगावमधील साकळी गावातून अटक करण्यात आली. नालासोपारा स्फोटक प्रकरण आणि दाभोलकर हत्याकांड प्रकरणाशी त्यांचा संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. वासुदेव सूर्यवंशी आणि विजय लोधी अशी या दोघांची नावे आहेत. वासुदेवच्या घराची तपासणी केल्यानंतर एटीएसकडून ही कारवाई करण्यात आली होती.

 

विजय लोधीकडून ३ गावठी बॉम्ब, २ मोबाईल, २ कार नंबर प्लेट, ४ पेन ड्राईव्ह मिळाले आहेत. वासुदेव सूर्यवंशीच्या घरातून १ डीव्हीडी, २ मोबाईल फोन, सिम कार्ड्स, ५ पॉकेट डायरीज मिळाल्या आहेत, अशी माहिती एटीएसने कोर्टात दिली आहे. शस्रास्रांसोबत ज्या कारचा वापर करण्यात आला त्याची पडताळणी करायची असल्याचं एटीएसने कोर्टात सांगितले.

 

कोर्टाने या दोन्ही आरोपींना १७ सप्टेंबरपर्यंतची कोठडी सुनावण्यात आली आहे. एटीएसने आतापर्यंत या प्रकरणी वैभव राऊत, शरद कळस्कर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर आणि अविनाश पवार या पाच जणांना अटक केली आहे. त्यानंतर आता हा आकडा सातवर गेला आहे. अटक आरोपीकडून जप्त केलेल्या दस्ताऐवजातून या सूर्यवंशीचे नाव समोर आले. त्या अनुशंघाने ही कारवाई करण्यात आली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@