अमित शाह अध्यक्षपदावर कायम...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2018
Total Views |


 

 

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुका भाजप अमित शाह यांच्या नेतृत्वखाली लढणार आहे. नवी दिल्लीत सुरु असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आगामी काळातील विविध राज्यातील विधानसभा व २०१९ च्या लोकसभा निवडणुकांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अमित शाह यांच्या नेतृत्वातच २०१९ ची निवडणूक लढवणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे पुढील वर्षभर ते अध्यक्षपदावर कायम राहणार आहेत.

 

नवी दिल्लीच्या आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये ही बैठक सुरु आहे. यावेळी अमित शाह यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांपेक्षा जास्त २०१९ मध्ये जागा जिंकण्याचा दावा केला आहे. यावेळी त्यांनी अजेय भाजपा असा नारा दिला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "आम्ही जो संकल्प केला आहे. त्या संकल्प शक्तीचा कोणी पराभव करू शकत नाही. कारण आमच्याकडे दुनियेतील सर्वात लोकप्रिय नेता आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही पुन्हा पूर्ण बहुमताने सत्तेत येऊ." त्याचबरोबर तेलंगणामध्ये पूर्ण ताकदिनिशी निवडणूक लढविणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@