अभाविपच्या आंदोलनाला यश, विद्यार्थ्यांचे वाचणार दोन कोटी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2018
Total Views |

विविध प्रकारच्या शैक्षणिक शुल्कात कपात

 
जळगाव, ८ सप्टेंबर :
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून सतत रिपिटर परीक्षेची फी कमी करण्यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाकडे मागणीचे निवेदन, आंदोलने करण्यात आली. दरम्यान, विद्यापीठाच्या समितीशी अभाविपच्या शिष्टमंडळाने चर्चा करून पाठपुरावाही केला. या पाठपुराव्याला यश आले असून चर्चेअंती रिपिटर फी कमी करण्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. यामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे दरवर्षी दोन कोटी वाचणार असल्याची माहिती आयोजित पत्रपरिषदेत महानगरमंत्री रितेश चौधरी यांनी दिली.
 
 
अभाविपने यासंदर्भात शनिवारी पत्रपरिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली. गेल्या वर्षी सुमारे ८५ हजार विद्यार्थ्यांनी दिली होती. यावेळी भरण्यात आलेली फी पुढील वर्षी होणार्‍या ऑक्टोबर, नोेव्हेंबर महिन्यातील सत्र परीक्षेला लागू असणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांचा आर्थिक फायदा होणार आहे.
 
 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे १३ डिसेंबर २०१६ पासून यासंदर्भात मागणीचे निवेदन विद्यापीठाला देण्यात आले होते. यावर दखल घेण्यात न आल्याने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. २३ ऑगस्ट २०१८ रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, अभाविपने शिष्टमंडळ स्थापन करून विद्यापीठाच्या सात सदस्यांशी चर्चा केली. चर्चेअंती रिपिटर परीक्षेसाठी प्रत्येक सत्रासाठी लागणारी फी आता फक्त एका विषयानुसार आकारण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
 
 
अभाविप शिष्टमंडळात स्मृती शर्मा, चेतन जाधव, हर्षल तांबट, कीर्ती गोयर हे सदस्य असून अध्यक्ष राजू पाटील होते. यावेळी नगरमंत्री पवन भोई, प्रदेश कार्यकारी सदस्य विराज भामरे उपस्थित होते.
 
 
कपात झालेले शुल्क
बी.ए.साठी आधी सत्र फी १६० होती तर आता ९० रुपये असणार आहे. (१ ते ३ विषयांसाठी), बी.कॉम.साठी आधी सत्र फी १८५ आता ९० (१ ते ३ विषयांपर्यंत), बी.एस.सी.साठी आधी सत्र फी ३००, आता १५० (तीन विषयांपर्यंत), अभियांत्रिकीसाठी आधी सत्र फी ७०५ होती आता १२० (प्रतिविषय), एम.बी.ए.साठी आधी सत्र फी ८००, आता ३०० रुपये (दोन विषयांपर्यंत) तर दोन विषयांपुढे ६०० रुपये (प्रतिसत्र), एम.ए.व एम.एस.सी. कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी आधी सत्र फी ४००, आता २०० रुपये (दोन विषयांसाठी) तर दोन विषयांपुढे (४०० रुपये), एम.एस.सी.साठी आधी सत्र फी ५००, व प्रोजेक्ट व व्हायव्हा १०००, आता २०० रुपये (दोन विषयांसाठी) तर दोन विषयांपुढे (प्रतिसत्र ४००) तर प्रोजेक्टसाठी फी नसून व्हायवा ४०० रुपये अशी फी आकारणी होणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@