बळवंत पतसंस्थेचे अध्यक्ष मधुकर पाटील बेस्ट चेअरमन पुरस्काराने सन्मानित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2018
Total Views |
 
 
जळगाव, ८ सप्टेंबर :
येथील बळवंत नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मधुकर पाटील यांना नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील सहकार परिषदेत बँकिंग फ्रंटियरतर्फे ‘बेस्ट चेअरमन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रिझर्व्ह बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक पी.के.अरोरा यांच्या हस्ते त्यांनी तसेच उपाध्यक्ष राधेशाम बजाज यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
 
 
नॅशनल को-ऑप. बँकिंग समिट आणि फ्रंटियर इन को-ऑप.बँकिंग अवॉर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल प्राईड प्लाझा अरिओसिटी येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसीय परिषदेत २०१७-१८ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कार्याबद्दल बँकिंग फ्रंटियरतर्फे के्रडिट सोसायटी श्रेणीत ‘बळवंत’चे अध्यक्ष मधुकर पाटील हे बेस्ट चेअरमन पुरस्काराचे मानकरी ठरले. या दोन्ही संस्थांतर्फे गेल्या १२ वर्षापासून भारतामधील उत्कृष्ट बँकांचा आणि पतसंस्थांचा वेगवेगळ्या विभागात गौरव केला जातो. या सन्मानाबद्दल मधुकर पाटील यांचे अभिनंदन होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@