मोबाईल नंबर पोर्ट होणार फक्त २ दिवसांत?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2018
Total Views |


 


नवी दिल्ली : मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) ७ दिवसांवरून लवकरच २ दिवसांवर येणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) कडून याबाबत अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले नसले, तरी लवकरच त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. कारण एप्रिल महिन्याच्या मसुद्यामध्ये MNP सहज होण्यासाठीचा उल्लेख असून यासाठी नवीन नियमावली देखील करण्यात आली आहे. त्यामुळे आता आपला एका मोबाईल कंपनीतून दुसऱ्या मोबाईल कंपनीत जाणे अधिक सोप्पे होणार आहे. दरम्यान, यापूर्वी ट्रायने पोर्टसाठी लागणारे १९ रुपयांचे शुल्क ४ रुपयांवर आणले होते.

 

कसा कराल मोबाईल नंबर पोर्टेबल

 

सध्याच्या कंपनीच्या सेवेबाबत तुम्ही संतुष्ट नसाल तर तुम्ही कंपनी बदलू शकता. कंपनी बदलली तरी तुमचा मोबाईल नंबर बदलणार नाही. यासाठी तुम्हाला १९०० या नंबरवर PORT <Space> Mobile Number असा मेसेज करावा लागतो. त्यानंतर कंपनीकडून युनिक पोर्टिंग कोड (UPC) येतो. त्यानंतर तुम्हाला ज्या कंपनीत जायचं आहे त्या कंपनीच्या रिटेलरजवळ UPC कोड आणि ओळखपत्र जमा करायची आहेत. ही प्रोसेस पूर्ण होण्यासाठी सध्या ७ दिवस लागतात मात्र लवकरच याचा कालावधी कमी होणार आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@