बाप्पांची स्वारी निघाली परदेशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Sep-2018
Total Views |



 

 

टिटवाळा : जसजसा गणेशोत्सव जवळ येत आहे तसतशी गणपतीच्या मूर्ती साकारणाऱ्या कारखान्यांमध्ये आणि बाजारपेठांध्ये भाविकांची लगबग पाहायला मिळत आहे. टिटवाळाही याला काही अपवाद नाही. टिटवाळ्यातील मूर्तीकार महेंद्र गोडांबे यांच्या ‘आशीर्वाद कला केंद्रा’मधील गणरायांच्या मुर्तींना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे येथील शेकडो बाप्पांची स्वारी यावर्षीदेखील परदेशी निघाली आहे.
 

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दि. १३ सप्टेंबर रोजी गणराय विराजमान होणार आहेत. यामुळे आता बाजारपेठांसह गणरायाची मूर्ती साकारणारे हातदेखील दिवसरात्र गणरायाचे रुप अधिक देखणे करण्यासाठी झटत आहेत. टिटवाळ्यातीव शाडू आणि प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींना लगतच्या परिसरासह मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, पुणे या शहरांत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच दुबई, अमेरिका, थायलंड, इंग्लंड या सातासमुद्रापार असलेल्या देशांमध्येही भाई गोडांबे यांच्या ‘आशीर्वाद कला केंद्र’ या कारखान्यातील गणेशमूर्तीना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यंदादेखील एक ते दीड फुटाच्या शेकडो गणेश मूर्ती परदेशात पाठवण्यात आल्याची माहिती गोंडांबे यांनी बोलताना दिली.

 

'यंदा शासनाच्या जीएसटी व सीएसटीचा फटका आम्हाला बसला आहे. मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या सामुग्रीवर वस्तू आणि सेवा कर आकारण्यात आला. पण मूर्ती विकताना तो आम्हाला आकारता येत नाही. गणेश मूर्ती घेणाऱ्या गिऱ्हाईकासदेखील जादा भाव लावून गणेश मूर्ती विकणे शक्य नाही. कुठेतरी तडजोड करावी लागते'.

- महेंद्र गोडांबे, मूर्तीकार,

आशीर्वाद कला केंद्र, टिटवाळा


- अजय शेलार
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@