धक्कादायक; तरुणीवर इस्लाम धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2018
Total Views |



मुंबई : २७ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करत इस्लाम धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरीत घडला आहे. याप्रकरणी ओशीवरा पोलिसांनी सय्यद अमीर सययद मन्सूर उर्फ शेरोज खान या आरोपीला अटक केली आहे. आरोपी पीडितेचे गेल्या दोन महिने लैंगिक शोषण करत होता. त्याचबरोबर व्हिडीओ शूटिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी देखील देत होता.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित मुलगी मूळची पुण्याची असून गेल्या दोन महिन्यांपूर्वी कामानिमित्त ती मुंबईत आली होती. यावेळी शेजारीच राहत असलेल्या शेरोज खान याची ओळख झाली. ओळख वाढल्याने शेरोजने या तरुणीला ईद निमित्त आपल्या घरी बोलावलं आणि त्याने तिला शिरकूर्मा खाण्याचा आग्रह केला. तरुणीने आरोपीच्या आग्रहाचा मान राखत शिरकूर्मा खाल्ला. मात्र काही वेळात ती बेशुद्ध पडली. तरुणीच्या असहाय्यतेचा फायदा घेत आरोपीने तरूणीवर लैंगिक अत्याचार करत त्याचे व्हिडीओ शूटिंग केले.

 

बेशुद्ध असलेल्या तरुणीला जग आल्यानंतर आपल्यावर अत्याचार झाल्याचे कळले मात्र आरोपीने व्हिडीओ शूटिंग केल्याचे कळल्याने ती गप्प झाली. याच गोष्टीचा फायदा घेऊन तो तरुणीवर गेले दोन महिने अत्याचार करत होता. यावेळी त्याने तरुणीचे केस देखील कापले होते. तसेच दाऊदपासून अबू सालेमपर्यंत सगळे गँगस्टर आपले मित्र असल्याचे धमकावत इस्लाम धर्म स्विकारण्याची जबरदस्ती करत होता. दरम्यान, शारीरिक व मानसिक अत्याचार असह्य झाल्याने तरुणीने ओशीवरा पोलीस स्टेशन गाठले. यावेळी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला अटक केली. पोलीस पुढील तपास करत आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@