‘सहकार भारती’चा उद्या जिल्हास्तरीय महिला मेळावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2018
Total Views |
 
 
जळगाव :
जिल्ह्यात सहकार क्षेत्रात काम करणार्‍या महिलांना अधिक मार्गदर्शन मिळावे आणि त्यांच्या सूचनांचा उपयोग महिलांच्या अधिक विकासासाठी व्हावा यासाठी ‘सहकार भारती’तर्फे शनिवार, ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते २ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
या मेळाव्यात बाल संरक्षण आयोग छत्तीसगडच्या माजी अध्यक्षा आणि नीती आयोगाच्या सदस्या शताब्दी पांडे मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्यास जिल्ह्यातून ५०० महिला उपस्थित राहतील असा अंदाज आहे. समाजाच्या जडणघडणीत, आर्थिक उलाढालीत महिलांचा मोठा सहभाग असतो. जिल्ह्यातील सहकारी संस्था, बँका, पतपेढ्यावर महिला संचालक म्हणून कार्यरत आहेत.
 
 
असंख्य महिला बचत गट चालवत आहे. त्या सहकार क्षेत्रात सक्षम व्हाव्या, सहकाराची त्यांना अधिक माहिती मिळावी, त्यांच्या अंगी असलेले नेतृत्व व कर्तृत्व यावर अधिक भरीव काम करून स्वतःला सिद्ध करावे हा या मेळाव्याचा उद्देश असल्याचे महाराष्ट्र बचतगट प्रमुख रेवती शेंदुर्णीकर यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
 
 
जिल्ह्यात सहकार क्षेत्रात व बचत गटात काम करणार्‍या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सहकार भारती प्रमुख व महाराष्ट्र बचतगट प्रमुख रेवती शेंदुर्णीकर, महानगर अध्यक्षा अनिता वाणी, जळगाव जिल्हा बचतगट संयोजिका सुनीता जोहरे, डॉ.आरती हुजूरबाजार, सावित्री सोळुंखे, शांता वाणी व सर्व पदाधिकार्‍यांनी केले आहे.
 
 
महिलांचे अनुभव कथन
या मेळाव्यात खडतर प्रवासातून प्रतिकूल परिस्थितीत बचतगटाच्या माध्यमातून मोठे कार्य करून, १० ते १५ महिलांना रोजगार देऊन उभे केलेल्या जिल्ह्यातील यशस्वी बचतगटांमधील महिला आपले अनुभव कथन करणार आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@