गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर परतले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2018
Total Views |


 


अफवांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा सुटकेचा निश्वास

 

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर अमेरिकेहून गुरुवारी रात्री पुन्हा गोव्यात परतले आहेत. ते स्वादुपिंडाशी संबंधित आजारपणामुळे गेल्या ८ दिवसापासून अमेरिकेत उपचार घेत होते. गेल्या काही दिवसांपासून पर्रिकर यांची प्रकृती अस्थिर असल्याची चर्चा होती. मात्र पर्रिकर उपचार घेऊन गोव्यात परत आल्याने कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

 
 
 

पर्रिकर यांच्या अनुपस्थित गोवा विधानसभेचं कामकाज चालू होतं. मात्र काँग्रेसने याला विरोध करत सरकारबदलाच्या हालचाली सुरु केल्या होत्या. त्याचबरोबर भाजपच्या गोटात देखील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चाना उधाण आले आले होते. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पर्रिकर पुन्हा गोव्यात परतल्याने भाजपच्या गोटात नवचैतन्य संचारले असून अफवांना पूर्ण विराम मिळाला आहे.

 

संबंधित बातम्या : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर उपचारासाठी पुन्हा अमेरिकेला 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 

 
@@AUTHORINFO_V1@@