चोपड्यात प्राध्यापकांचे पगारासाठी धरणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2018
Total Views |

चौथ्या दिवशीही ठिय्या, विद्यार्थ्यांचाही पाठिंबा

 
चोपडा :
येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित पॉलिटेक्निक कॉलेजमधील १५ प्राध्यापकासह कर्मचार्‍यांनी नियमित पगार, आतापर्यत कपात केलेला पगार मिळावा, यासाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. या धरणे आंदोलनाचा गुरूवारी चौथा दिवस होता. विद्यार्थ्यांनी गुरूवारी मोर्चा काढत या आंदोलनाला पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांनी दोन तास ठिय्या आंदोलन केले.
 
 
तसेच संस्थेचे अकाउंटट सुरेश मयाराम पाटील हे संस्थेचे अध्यक्ष ऍड संदीप पाटील ,सचिव डॉ. स्मिता पाटील व प्राचार्य नरेश शिंदे याच्या आदेशानुसार एचडीएफसी या खासगी बँकेतून काढून घेतात. अशा पद्धतीचा कारभार गेल्या ५ ते ६ वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे आर्थिक शोषण होऊन कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे तसेच या कर्मचार्‍यांना खोटे मेमो दिले जात आहेत. संस्थेतील कर्मचार्‍यांना बेकायदेशीर बडतर्फी करून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या मागण्यासाठी गुरूवारी ६ रोजी देखील चौथ्या दिवशी प्राध्यापकाचे चोपडा शिवाजी चौकात धरणे आंदोलन सुरू होते. धरणे आंदोलनात प्रा. जयेश भदाणे, प्रा.सागर साळुंके, प्रा.महेश रावतोळे, प्रा.मनोज पाटील, प्रा.प्रशांत बोरसे, प्रा.राहुल बडगुजर, प्रा.लक्ष्मीकांत पाटील, प्रा.सचिन पाटील, तसेच शिक्षकेतर कर्मचारी, हिरालाल माळी, ज्ञानेश्वर शकपाळ, मनोज कासार, उदयकुमार अग्निहोत्री, योगेश महाजन, नरेंद्र विसपुते सहभागी झाले होते. आंदोलनाला नगरसेवक भुपेंद्र गुजराथी, सेना शहरप्रमुख आबा देशमुख यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
आंदोलनात विद्यार्थ्यांचा सहभाग
येथील शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक)मधील कर्मचार्‍याच्या थकीत वेतनासठी शिवाजी चौकात बेमुदत धरणे आंदोलनाला प्राध्यापक व कर्मचारी बसल्याने गुरूवारी पॉलिटेक्निक कॉलेजमधील शिकणार्‍या विद्यार्थीनी शिवाजी चौकात येऊन आपल्या प्राध्यापकांना पाठींबा दिला. दोन तास त्यांच्या सोबत बसून धरणे आंदोलन केले. त्यानंतर तहसीलवर मोर्चा काढून तहसीलदार दीपक गिरासे यांना मागण्याचे निवेदन दिले. विद्यार्थ्यांनी निवेदनात म्हटले आहे की, महात्मा गांधीच्या नावाने संस्था चालवीत असताना शिक्षकांची जी फसवणूक सुरू आहे ती धक्कादायक आहे. निेवेदनावर स्नेहा सुर्यवंशी, प्राजक्ता पाटील, तृप्ती पाटील, हर्षल पाटील,निलेश अहिरे, दिनेश गुजराथी,रोशन परदेशी, दीपेश चौधरी, शिवम लाड,सुशील सोनवणे, निलेश बोरसे,कुलदीप पाटील,निखिल जोशी, प्रणव सोनवणे, मिलिंद महाजन, शुभम गुरव, मानसी अत्तरदे आदी विद्यार्थ्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@