पवन सोनवणेंच्या इशार्‍याने प्रशासन नरमले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2018
Total Views |

ना.गुलाबराव पाटील यांच्या दणक्याने मोहाडीला पाणीपुरवठा

 
 
जळगाव :
मोहाडी गावाला ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. जि.प.च्या सर्वसाधारण सभेत याबाबत प्रश्‍न उपस्थित केला होता. तेव्हा मला लकवरच यावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन सत्ताधारी आणि जि.प.प्रशासनाने दिले होते. परंतु पाच दिवस उलटूनही यावर काहीच तोडगा न निघाल्याने नागरिकांच्या समस्या सुटत नसल्याचे पाहून जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे यांनी जिल्हा परिषदेसमोर गुरुवारी आत्मदहनाचा इशारा दिला होता.
 
 
बुधवारी ५ रोजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे यांनी जि.प.प्रशासनाला मोहाड़ी गावाला गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पाणी सोडण्यात नाही आले तर जि.प.समोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पवन सोनवणे यांनी बुधवारी सायंकाळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केली. त्याची दखल घेत ना. पाटील यांनी जिल्हा परिषदेचे अधिकारी यांना दूरध्वनीवरुन दणका देवून पाणी सोडण्याच्या सूचना दिली. त्यानंतर जि.प.प्रशासनाने हालचाली गतिमान करुन गुरुवारी सकाळीच सात वाजता मोहाड़ी गावाला पाणी पुरवठा सुरळीत केला.
 
 
जि.प.सदस्य पवन सोनवणे यांच्या प्रयत्नाने मोहाड़ी गावात पाणी पुरवठा झाल्यामुळे ग्रामस्थांनी ना. गुलाबराव पाटील आणि पवन सोनवणे यांचे आभार मानले आहे.
 
 
जि.प.त दिवसभर चर्चा
यासंदर्भात राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दणका दिल्याने गुरुवारी सकाळीच मोहाडीला पाणी सोडण्यात आल्याने पवन सोनवणे यांच्या आत्मदहनाच्या इशार्‍याने जिल्हा परिषद प्रशासन नरमल्याची चर्चा गुरुवारी दिवसभर होती.
@@AUTHORINFO_V1@@