महाआरोग्य शिबिरात सात हजारांवर रुग्णांची नोंदणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2018
Total Views |

धुळ्यात १६ रोजी विनामूल्य शिबीर, जय्यत तयारी सुरू

 धुळे :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाजवळील मैदानावर १६ सप्टेंबर रोजी विनामूल्य अटल महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरासाठी आतापर्यंत सात हजारांवर रुग्णांची नोंदणी झालेली आहे.
 
 
या शिबिराची सध्या जय्यत तयारी सुरू असून मैदान सपाटीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. तसेच जिल्ह्यातील गावागावांत वैद्यकीय पथकातर्फे शिबिर पूर्व रुग्ण तपासणी सुरू झाली आहे. धुळे येथे १६ सप्टेंबर रोजी अटल महाआरोग्य शिबिर होत आहे. या शिबिरासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समिती गठित करण्यात आली आहे. याशिवाय विविध समित्याही गठित करण्यात आल्या आहेत. या शिबिरासाठी उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ हे समन्वयक अधिकारी आहेत. मैदान समितीच्या माध्यमातून श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयालगतच्या मैदानावर शिबिर होणार आहे. या मैदानाच्या सपाटीकरणाच्या कामाने घेतला आहे. त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
 
 
या कामाची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रकांत वाघ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, ना. महाजन यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव आदींनी केली आहे.
 
 
या तपासण्या होणार मोफत
अटल महाआरोग्य शिबिरात नेत्र, अस्थिव्यंग, हृदयरोग, मेंदू रोग, शस्त्रक्रिया, मूत्र रोग, प्लास्टिक सर्जरी, कान- नाक- घसा, स्त्री रोग, कर्क रोग, दंतरोग, श्वसन विकार, क्षयरोग, ग्रंथीचे विकार, लठ्ठपणा, मानसिक आरोग्य, त्वचा व गुप्तरोग, जेनेटिक विकार आदी विकारांवरील तपासणी करुन औषधोपचार, शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शिबिरात सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या, एक्स- रे, सोनोग्राफी,, इएमजी, इसीजी, २- डी इको, इइजी, मॅमोग्राफी (स्तनाच्या कॅन्सरची तपासणी), पी. एफ. टी. तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.
@@AUTHORINFO_V1@@