सबसे गिरा रुपय्या! प्रति डॉलर ७२ रु.वर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Sep-2018
Total Views |

रुपया प्रति डॉलर ७३ रु.वर तज्ञांमध्ये एकमत
आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकांमुळे रुपयावर दबाव

 
 
 
प्रवासी वाहतूक, पर्यटन व्यवसायाला लवकरच मिळणार दिलासा!
रुपयाची ‘शंभरी’ही भरण्याची शक्यता...
 
भारतीय रुपयाने अखेर आज गुरुवारी प्रति डॉलर ७२ रुपये ११ पैशांचा विक्रमी नीचांक(सबसे गिरा रुपय्या!) गाठलाच! काल बुधवारीही तो प्रति डॉलर ७२ रुपये या दराच्या नजीकच म्हणजे प्रति डॉलर ७१ रुपये ९६ पैसे एवढा झालेला होता. तज्ञांच्या मते रुपया आता प्रति डॉलर ७५ रुपयांपर्यंतही लोळण घेण्याची शक्यता आहे! कच्च्या तेलाच्या सतत वाढत्या किंमती व जेमतेम सहा महिन्यांवर आलेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुका आणि अमेरिका-चीन दरम्यान रंगलेले व्यापार युद्ध (ट्रेड वॉर) यासह अनेक घटक यास कारणीभूत आहेत.
 
 
त्यामुळेही रुपयावर दबाव येऊ लागलेला आहे. यापुढे रुपयाची काय स्थिती होईल यावर मात्र तज्ञांमध्ये मतभिन्नता आहे. काहींच्या मतानुसार रुपया प्रति डॉलर ६८ रु.पर्यंत खाली असल्यास तो सावरु शकतो. तर काहींच्या म्हणण्यानुसार प्रति डॉलर ७० रु. किंवा ६९ रु. वरही रुपया सावरण्याची शक्यता राहील.
 
 
तर रुपया किती घसरणार यावर तो प्रति डॉलर ७३ रु.पर्यंत गडगडणार असल्यावर तज्ञांमध्ये एकमत आहे. पण रुपया तिथेच थांबणार की आणखी खाली जाणार याबाबत काही तज्ञांनी मात्र तो एखाद्या वेळी प्रति डॉलर ७५ पर्यंतही जाऊ शकतो असे मत नोंदविले आहे. रुपयाची ही घसरण थांबविण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेलाच हस्तक्षेप करावा लागणार आहे. त्यासाठी अमेरिकन डॉलरची विक्री मोठ्या प्रमाणावर जाहीर करावी लागेल. पण त्यामुळे विदेशी चलनाचा साठा कमी होणार असल्याने सरकारला तेवढा धोका (रिस्क) पत्करता येणे शक्य होणार नाही. हे विदेशी चलन प्रामुख्याने आयातीसाठी खर्च करावे लागत असते.
 
 
प्रवासी वाहतूक व पर्यटन व्यवसायाला लवकरच वस्तू व सेवा करा(जीएसटी)तून दिलासा मिळण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. अर्थमंत्रालयाकडून एक स्पष्टीकरण देण्यात येणार असून त्याद्वारे या क्षेत्रातील व्यावसायिकांना वेगवेगळ्या राज्यातील खर्चाचा अलग अलग हिशेब ठेवण्याची गरज भासणार नाही. तसेच या व्यवसायाशी निगडीत कागद पत्रांची कार्यवाही सोपी होणार असल्याने इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणेही सुलभ होणार आहे.
 
 
त्यामुळे एकापेक्षा अधिक राज्यांमध्ये प्रवास करणार्‍या पर्यटकांचा अलग अलग राज्यांचा हिशेब ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही. आता एकमुठी खर्च दाखविला जाऊ शकेल व देशांतर्गत पर्यटकांच्या धर्तीवर इनपुट टॅक्स क्रेडिटचा क्लेमही करता येणार आहे.
 
 
तरीही पर्यटन व्यावसायिक यावर पूर्णत: समाधानी नाहीत. त्यांनी आपल्या उद्योगासाठी जीएसटीचा दर ५ टक्क्यांवर आणण्याची मागणी केली आहे. डॉलरशी संबंधित रुपयाच्या चढउतारामुळे या उद्योगाला जीएसटी भरण्यात अनेक समस्या येत आहेत. विदेशी पर्यटकांकडून अग्रिम रक्कम (ऍडव्हान्स) मिळताच एजंट जीएसटीचा एक भाग भरुन टाकत असतो. नंतर इन्व्हॉईस जारी करण्यात आल्यानंतर आणखी एक भाग भरला जातो. अडचणी ही आहे की, जर डॉलरच्य किंमतीत रुपयात फरक पडत असेल तर जीएसक्ष कोणत्या चलनातील किंमतीवर भरण्यात यावा? या समस्येवर अर्थमंत्रालयाकडून सध्या समीक्षा केली जात आहे.
 
 
कच्च्या खनिज तेला(क्रूड ऑईल)च्या किंमतींनी सध्या ‘उत्तर’(तेजीची) दिशा पकड लेली आहे. तरीही काही तज्ञां च्या मते क्रूडला प्रति पिंप ८० डॉलर ५० सेेंट्सवर प्रतिकार होण्याची शक्यता आहे. पण क्रूडने प्रति पिंप ८२ डॉलरच्या वर उसळी घेतली तर ते ९१ डॉलर प्रति पिंप पर्यंत जाऊ शकते! तेजीचा हा क्रम सुरुच राहिला तर मात्र क्रूड ‘शतकी मजल’(प्रति पिंप १०० डॉलर) गाठू शकते. अशा वेळी विशेषत: क्रूड आयाती वर अवलंबून असलेल्या भारता सारख्या देशांच्या बाबतीत परिस्थिती अतिशय बिकट बनू शकते. भारताची ८० टक्के क्रूडची गरज आयातीद्वारेच भागत असल्याने त्याला या अवमूल्यनाचा मोठा फटका बसणार आहे.
 
 
अशा वेळी भारतीय रुपयाचे किती अवमूल्यन होईल याला सुमारच राहणार नाही. कदाचित त्यावेळी त्याची ‘शंभरी’(प्रति डॉलर १०० रुपये विनिमय दराच्या स्वरुपात) देखील भरली जाऊ शकते! मग माहिती तंत्रज्ञान (आयटी)सह अनेक निर्यातक्षम क्षेत्रांसाठी ‘बहोत अच्छे दिन’ येणार असल्याने फारसे घाबरुन जाण्याचे कारण राहणार नाही.
 
अखेरच्या तासात चांगलाच सावरला शेअर बाजार, निर्देशांकात सुधारण
बँक निफ्टीच्या फ्युचर्स ऍण्ड ऑप्शन्सच्या साप्ताहिक एक्सपायरी दिवशी अखेरच्या तासात शेअर बाजार चांगलाच सावरला गेला. त्याच्या दोन्ही महत्वाच्या निर्देशांकात भरीव सुधारणा झाली. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) हे सकाळी अनुक्रमे ३८ हजार १६१ बिंदू व ११ हजार ५१४ बिंदूंवर उघडले आणि ३७ हजार ९१२ बिंदू व ११ हजार ४३६ बिंदूंच्या नीचांकी पातळीपर्यंत आल्यानंतर अखेरच्या काही मिनिटात ते ३८ हजार ३२० बिंदू व ११ हजार ५६२ बिंदूंच्या उच्च पातळीवर जाऊन उसळी घेत दिवसअखेरीस ते अनुक्रमे २२४ बिंदू व ५९ बिदूंंनी वाढून ३८ हजार २४२ बिंदू आणि ११ हजार ५३६ बिंदूंवर बंद झाले. सोने देखील प्रति १० ग्रॅममागे ३१४ रुपयांनी वाढून ३० हजार ६२९ रुपयांवर आले होते. बँक निफ्टीदेखील ९२ बिंदूंनी वाढून २७ हजार ४६८ बिंदूंवर बंद झाला.
 
@@AUTHORINFO_V1@@